
बातमी 24तास
अतिश मेटे ( प्रतिनिधी ) : मंचर शहरातील विश्वविहार सोसायटीच्या श्री गणेश मंदिरामध्ये श्री गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण समारंभ मोठ्या उत्साहात व धार्मिक पद्धतीने पार पडला. दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. कलश मिरवणुकीने सोहळ्याची सुरुवात श्री गणेश मूर्ती व कलशाची भव्य मिरवणूक मंचर शहरातून काढण्यात आली. ढोल-लेझीम पथकांच्या गजरात, तसेच सोसायटीतील महिला डोक्यावर कलश घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
धार्मिक विधी व पूजन कार्यक्रम,मिरवणुकीनंतर श्री गणेशमूर्ती पूजन, पुण्याहवाचन, सर्व पिठांची पूजा, श्री गणेशमूर्ती जलाधिवास, धान्यादिवास असे विविध धार्मिक विधी पार पडले. यानंतर विठ्ठल-रुक्मिणी प्रसादिक भजनी मंडळाचा भजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण विधी होमहवन, कलशपूजन, धार्मिक विधी व श्री गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोसायटीतील त्रिवेदी काका यांच्या हस्ते पार पडली. विधी संपल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
आयोजन समितीचे योगदान :- या सोहळ्याचे यशस्वी आयोजन व व्यवस्थापनासाठी सुनील थोरात, विकास सुपेकर, अजित क्षीरसागर (सर), विलास शिंदे, राहुल मावकर, बाळासाहेब आरुडे, आकाश पवार, उमेश बारगळ, दीपक नेहे, किरण थोरात, विश्वनाथ खुडे, आकाश वर्पे, हर्षल केंगले यांनी मोलाचे योगदान दिले.
महिला कार्यकर्त्यांचा सहभाग :-कार्यक्रमाचे सुंदर नियोजन व व्यवस्थापनाबद्दल सोसायटीतील महिला कार्यकर्त्या सुवर्णा सुपेकर, ज्योती शिंदे, मोनिका क्षीरसागर, वर्षा थोरात, प्रियांका मावकर यांनी समाधान व्यक्त केले. सोहळ्याबाबत विश्वविहार सोसायटीचे विद्यमान बिल्डर तुषार बाणखेले म्हणाले, “गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेचा हा सोहळा सोसायटीसाठी ऐतिहासिक ठरला असून सर्व सदस्यांनी एकजुटीने केलेले आयोजन कौतुकास्पद आहे.” भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या या सोहळ्यामुळे विश्वविहार सोसायटी परिसर गणेशभक्ती व धार्मिक उत्साहाने उजळून निघाला.
