बातमी24तास
प्रतिनिधी: आरिफ भाई शेख
पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष जमीर काझी. यांनी पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यात पक्ष बांधणीचे काम हाती घेतले आहे त्यामध्ये नारायणगाव येथील निसार जैनुद्दीन आतार यांची पुणे जिल्ह्याच्या अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष म्हणून नियुक्तीपत्र देऊन उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे काँग्रेस पक्षाचे कार्य तळागाळात पोहोचवण्यासाठी पक्ष कार्यकारणी मजबूत करावी या हेतूने कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत त्या निमित्ताने नुसार आता यांची नियुक्ती पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्षपदी करण्यात आली आहे,
माजी आमदार संग्राम थोपटे. चंद्रकांत गोरे चाकण, मंचर ग्रामपंचायत चे माजी सरपंच राजू इनामदार., आंबेगाव तालुका मार्केट कमिटीचे माजी उपाध्यक्ष अल्लू इनामदार,तसेच मोठ्या संख्येने अल्पसंख्याक सेल मधील कार्य करणारे कार्यकर्ते उपस्थित होते पुणे येथील काँग्रेस भवन येथे त्यांचा त्या निमित्ताने सत्कार करण्यात आला आहे.