वसुंधरा बहुउद्देशीय संस्थेची 2024/25 कार्यकारिणी जाहीर

Share This News

बातमी24तास

(अभिजित सोनावळे)

वसुंधरा बहुउद्देशीय संस्थेची या वर्षातील सर्वसाधारण सभा नुकतीच व पार पडली. सौ. छाया रतन परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अतुल सव्वाखंडे सर यांनी संस्थेची माहिती दिली.वसुंधरा बहुउद्देशीय संस्था गेली 18 वर्ष चाकण व परिसरात तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पर्यावरण पूरक उपक्रम ,वन्य सजीवन संरक्षण व संवर्धन, सामाजिक प्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक जाणीव प्रकल्प, व्यसनमुक्ती उपक्रम असे विविध कार्यक्रम आयोजित केले व ते यशस्वीपणे पार पाडले गेले.

या सर्व कार्यक्रमासाठी समविचारी संघटनातील अनेक कार्यकर्त्यांनी संस्थेमध्ये वेळोवेळी सहकार्य केले तरी यापुढे वसुंधरा बहुउद्देशीय संस्थेच्या अधिकृत बॅनरखाली इथून पुढेही असे कार्यक्रम विविध शाळा, कॉलेजेस, वाड्या, वस्त्या, सोसायटी व जिथे जिथे आवश्यकता असेल तिथे तिथे उपक्रम राबविण्यात येतील.

यावेळी धनंजय शेवकरी, राहुल देशमुख, राजेंद्र जगनाडे,किशोर भुजबळ, महेश घाडगे, मनोहर शेवकरी, प्रमोद बचुटे आदी उपस्थित होते.संस्थेची नविन कार्यकरणी खालीलप्रमाणे सर्वानुमते संमत करण्यात आली .

अध्यक्ष :- श्री धनंजय शेवकरी उपाध्यक्ष:- श्री किशोर भुजबळ कार्याध्यक्ष:- श्री राहुल देशमुख सचिव:- श्री प्रमोद बचुटे सहसचिव:- सौ छाया परदेशीखजिनदार :- श्री राजेंद्र जगनाडे संचालक:- श्री अतुल सवाखंडे संचालक:- श्री महेश घाडगे संचालक:- श्री मनोहर शेवकरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy