बातमी 24तास Web News Portal
(बीड प्रतिनिधी ) मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने आज मुंबईत तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार आहे. मुंबई महापालिकेसाठी भाजपने मिशन 150 चा नारा दिला आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपने जोरदार तयारी सुरू केलेली असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.भाजप 150 चा नारा देत आहे. नारे कसले देता? निवडणुका घ्यायला तुमची फाटते का? तसेच भाजपला आम्ही साठ वर ऑल आउट करू असा उपरोधिक टोला राऊत यांनी लगावाला . मुंबई महापालिका निवडणूक घ्यायला फाटते का?तेवढेच सांगा या निवडणुकातून पळ कशाला काढताय न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक का ठेवत आहात. न्यायालयाचा ज्याप्रकारे गैरवापर सुरू आहे. कायद्याचा गैरवापर सुरू आहे.अशा प्रकरणावर बोला खुलासा करा असं आव्हानच संजय राऊत त्यांनी भाजपला दिला आहे. दीडशे जागा जिंकणार आहात या मैदानात पळ कशाला काढता कर्नाटकात 200 जागा जिंकणार होता. कर्नाटक जिंकण्यासाठी सर्व फौज उतरवली, मंत्रिमंडळ उतरवलं फक्त राष्ट्रपतींना उतरण्याच बाकी होते. काय झालं कर्नाटकात निकाल तुमच्या समोरच आहे.ते दीडशे ची भाषा करतात त्यांना 60 मध्ये ऑल आउट करू असं देखील राऊत म्हणाले मागील लोकसभेत शिवसेनेचे एकूण खासदार होते 18 महाराष्ट्रात आणि एक महाराष्ट्र बाहेर आमचा लोकसभेचा 19 चा आकडा कायम राहील कदाचित वाढेलही ज्या जागा आम्ही जिंकल्या त्या कोणत्याही पद्धतीने कायम ठेवू त्यात कोणाला त्रास होण्याचं कारण नाही असेही ते म्हणाले.