बातमी 24तास Web News Portal
(प्रतिनिधी आरीफभाई शेख) तुळजाभवानी मंदिर तसेच महागणपती रांजणगाव येथे वस्त्र परिधान करणाऱ्या वर बंदी घालण्यात आलेली आहे अंग प्रदर्शन होईल तसेच वेस्टर्न स्वरूपाचे कपडे घालून येणाऱ्या मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही अशी फलकबाजी ही करण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरामध्ये तशा स्वरूपाची अंमलबजावणी केली जाईल किंवा नाही याबाबत विचारणा केली असता एडवोकेट विकास ढगे पाटील पालखी सोहळा प्रमुख यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी माहिती दिली की श्री माऊली देवस्थान हे महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरामध्ये संस्कार आणि परंपरेसाठी ओळखले जाते त्यामुळे इतर मंदिरांमध्ये ज्याप्रमाणे लोक वेस्टर्न कपडे किंवा अंग प्रदर्शन करणारे कपडे घालून येतात त्या प्रमाणात आळंदीच्या माऊली मंदिरामध्ये कसल्या प्रकारची लोक किंवा कपडे परिधान केलेली लोक ही पाहण्यात आलेली नाहीत तसेच आढळून आल्यास त्याची प्रमाणात खूप तुरळक आणि कमी आहे त्यामुळे आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरामध्ये अंग प्रदर्शन करणारे कपडे वेस्ट धारण करण्यात प्रतिबंध घालावा अशी परिस्थिती मला तरी वाटत नाही असे मत विश्वस्त पालखी सोहळा प्रमुख एडवोकेट विकास ढगे यांनी व्यक्त केला आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले की माऊलींचे मंदिर हे संस्कार परंपरा आणि रूढी वर आधारलेला आहे या ठिकाणी येणारा भाविका एक वेगळे संस्कार मनात घेऊन येत असतो त्यामुळे या ठिकाणी अशा कुठल्याही प्रकारच्या परिधान केलेल्या वस्त्रांमध्ये लोकांची संख्या आपल्याला दिसून येणार नाही विशेषता असा प्रकारच या माऊलींच्या दारामध्ये कधी घडत नसल्याने तशी बंदी आणणे बाबत आवश्यकता नसल्याचे वाटते., तसेच आपणही याबाबतीमध्ये अनुभव घेऊ शकता माऊलींच्या मंदिरात येणारा भाविक हा संस्कारी आणि पारंपरिक वेश परिधान करूनच येत असतो हे निदर्शनात येते त्याचबरोबर पालखी सोहळा प्रस्थान च्या बाबत मोठ्या प्रमाणात भाविकांना आरोग्य सुविधा सोयी पुरवाव्यात यासाठी मी कटिबद्ध आहे अशी ही ग्वाही त्यांनी या निमित्ताने बोलताना दिलेले आहे वारी आनंदात उतघात व्हावी यासाठी इतर विश्वस्तांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि वारकरी भाविक ग्रामस्थ यांचा विश्वास मी नक्कीच संपादन करून दाखवेल असे त्यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.