रेडझोन प्रभावित तळवडेसुद्धा आता विकासाच्या स्पर्धेत अग्रेसर!

Share This News

बायोडाव्हर्सिटी पार्कला महापालिका आयुक्तांची गती – भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश

बातमी24तास, ऑनलाईन न्यूज पोर्टल

पिंपरी । प्रतिनिधी : तळवडे येथील नियोजित जागेत बायोडाव्हर्सिटी पार्क (जैवविविधता उद्यान) विकसित करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा शेखर सिंह यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, निविदा प्रक्रिया राबवण्याची कार्यवाही होणार आहे. त्यामुळे समाविष्ट गाव आणि रेडझोनमुळे प्रभावित झालेले तळवडेसुद्धा विकासाच्या स्पर्धेमध्ये अग्रेसर होणार आहे. समाविष्ट गावांच्या विकासाचा संकल्प आमदार महेश लांडगे यांनी ‘व्हीजन- २०२०’ अंतर्गत सोडला होता.

चिखली, मोशी, चऱ्होली, डुडूळगाव, दिघी, बोऱ्हाडेवाडी आदी भागात २०१७ पासून विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागले. तसेच, विविध विकासकामांचे नियोजन करण्यात आले. मात्र, तळवडे भागात रेडझोनच्या प्रभावामुळे विकासकामे आणि पायाभूत सोयी-सुविधा देण्यात अडचणी येत होत्या. मात्र, अन्य समाविष्ट गावांच्या सोबतच तळवडेचाही विकास त्याच गतीने झाला पाहिजे, असा आग्रह आमदार लांडगे यांनी धरला होता.पिंपरी-चिंचवड शहरातील वाढते तापमान तसेच प्रदुषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने तळवडे येथे जैवविविधता उद्यान उभारण्याची आवश्यकता आहे. शहरीकरण व नागरिकीकरणामुळे सरासरी तापमानात आणि प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे शहरातील नैसर्गिक स्त्रोतांच्या संवर्धनासाठी तसेच नागरिकांना जैवविविधता उद्यानाचे महत्व पटवून देण्यासाठी त्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने तळवडे जैवविविधता उद्यान विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे सुमारे १०० कोटी रुपयांचा खर्च राज्य व केंद्र सरकार आणि महापालिका प्रशासन असा संयुक्तपणे करणार आहे.तळवडे येथील रेड झोन हद्दीतील गायरान जागेत बायोडायव्हर्सिटी पार्क (जैवविविधता उद्यान) विकसित करण्याबाबत प्रशासनाने पुढाकार घ्यावा. त्यासाठी सल्लागार नियुक्ती करावी आणि निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आमदार लांडगे यांनी लावून धरली होती. निगडी, चिखली, तळवडे, मोशी आणि परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. त्यामुळे तळवडेतील जैवविविधता उद्यान विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. जैवविविधता उद्यानामध्ये वेगवेगळी वनस्पती, दुर्मिळ औषधी झाडे व वेली, देशी जातीचे झाडे, फळ व फुल झाडे अश्या संकल्पनेवर विशिष्ट थीमवर झाडांची लागवड करून संवर्धन करावे. पर्यटकांना फिरण्यासाठी ट्रॅक, खाद्यपदार्थाचे स्टॉल, मनोरंजनाची साधणे, असा अत्याधुनिक सोयी-सुविधा असलेला देशातील सर्वांत मोठा हे बायोडायव्हर्सिटी पार्क उभारल्यास पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. जैवविविधता उद्यान शहराचा ‘ऑक्सिजन पार्क’ ठरेल : आमदार लांडगे आमदार लांडगे म्हणाले की, जागतिक बँकेच्या २०१८ सालच्या एका अहवालानुसार, भारतात एकूण लोकसंख्येच्या ३६ टक्के लोक वेगवेगळ्या कारणांसाठी शहरात वस्ती करतात. त्यामुळे शहरांची रचना करताना, नागरिकांना आरोग्यविषयक आणि इतर मूलभूत सोयी पुरवताना निसर्गाचे रक्षण आणि संवर्धन यांकडेही लक्ष दिले पाहिजे. विनामूल्य शुद्ध हवा आणि आल्हाददायी गारवा या आरोग्यदायक सेवांमुळे अशी उद्याने म्हणजे शहराची फुप्फुसेच अर्थात ‘ऑक्सिजन पार्क’ ठरणार आहेत, अशी आमची भूमिका आहे. प्रतिक्रिया : समाविष्ट गावांचा विकास हा आमचा प्रमुख अजेंडा राहिला आहे. भोसरी विधानसभा मतदार संघातील सर्वच समाविष्ट गावांमध्ये २० वर्षांपासून रखडलेला विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. मात्र, रेड झोनच्या प्रभावामुळे तळवडेतील प्रकल्प आणि पायाभूत सोयी-सुविधा विकासाचा तांत्रिक अडचणी येत होत्या. राज्य व केंद्र सरकारच्या मदतीने आता महापालिका प्रशासन तळवडेत बायोडायव्हर्सिटी पार्क विकसित करणार आहे. त्यामुळे विकासाच्या स्पर्धेत तळवडेसुद्धा आघाडीवर राहील, असा विश्वास वाटतो. – महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy