जबरी चोरीचे गुन्हयाची चाकण पोलीसांकडुन अवघ्या १२ तासात उकल

Share This News

बातमी24तास, ऑनलाईन न्यूज पोर्टल

(वृत्त सेवा) मारहाण करत गळयातील १५ तोळे सोन्याची चैन जबरीने हिसकावून झालेल्या चोरीच्या गुन्हयाची चाकण पोलीसांनी अवघ्या १२ तासात उकल करत तीन सराईतांना अटक करून त्यांचेकडुन सोन्याची चैन सह ३,७०,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,दिनांक ०१/०९/२०२३ रोजी, सतीष कुंडलीक गव्हाणे, वय ५७ वर्षे, धंदा हॉटेल, रा. पाटीलवाडी कोरेगाव भिमा ता. शिरूर जि. पुणे यांच्या फिर्यादी नुसार, बहुळ गावचे हददीत चाकण शिक्रापुर रस्त्यालगत हॉटेल एस. के. येथे तीन अनोळखी चोरट्यांनी मोटार सायकलवर येवुन फिर्यादी व साक्षीदार यांना लाकडी दांडके व पीव्हीसी पाईपने मारहाण करून फिर्यादी सतीष गव्हाणे यांचे गळ्यातील १५ तोळे वजनाची सोन्याची चैन जबरीने हिसकावून चोरून मोटार सायकल वरून पळुन गेले.

फिर्यादी यांचे तक्रारीवरून चाकण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं ६९८ / २०२३ भादवि कलम ३९४, ३४ प्रमाणे दाखल करण्यात आलेले आहे.सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवुन चाकण पोलीस स्टेशनचे वपोनि वैभव शिंगारे यांनी तसेच चाकण पोलीस स्टेशन कडील तपास पथकाने सदर गुन्हयाचे घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – १ विवेक पाटील, सहा. पोलीस आयुक्त, राजेंद्र गौर यांनी सदर गुन्हा उघडकीय आणण्याचे अनुषंगाने सुचना व मार्गदर्शन केले.गुन्हे शोध पथक (डीबी) पथकाने गुन्हयाचे घटनास्थळावरील फिर्यादी व साक्षीदार यांचेकडुन घटनेची सविस्तर माहिती घेतली, तसेच सदर गुन्हयाचे घटनास्थळ परीसरात तात्रक तपास करून चाकण पोलीस स्टेशन कडील डी. बी. पथकाचे सपोनि विक्रम गायकवाड व पोना हनुमंत कांबळे, पोका प्रदिप राळे, पोका निखील वर्षे यांचे पथकाने कसोशीने तपास करून खेड, होलवाडी टाकळकरवाडी तसेच वाकी बुआ येथे सापळा रचुन अतिशय सिताफीने आरोपी नामे १) श्रीराम संतोष होले, वय २५ वर्षे, रा. होलेवाडी ता. खेड जि. पुणे, २) प्रतिक उर्फ बंटी दत्तात्रय टाकळकर वय २१ वर्षे, रा. टाकळकरवाडी ता. खेड जि. पुणे, ३) बबलु रमेश टोपे, वय २३ वर्षे, रा. वाकी बु॥ ता खेड जि पुणे यांना ताब्यात घेतले त्यावेळी वरील आरोपींचे ताब्यातुन सदर गुन्हयातील फिर्यादी यांची चोरी केलेली सोन्याची चैन, तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटार सायकल असा एकुण ३,७०,०००/- रु. किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे.

वरील अटक आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर यापुर्वी चोरी, जबरीचोरी, अवैध शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हयात वरील आरोपी तीनही आरोपींना अटक करण्यात आलेली असुन त्यांची दिनांक ०५/०९/२०२३ रोजी पावेतो पोलीस कोठडी मंजुर आहे.सदरची कारवाई पोलीस आयुक्त, विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त, संजय शिंदे, पोलीस आयुक्त, वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १ विवेक पाटील, सहा. पोलीस आयुक्त, अपर राजेंद्र गौर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे तसेच तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोउनि / विनोद शेंडकर, पोउनि / सागर बामणे, पोसई अभिजीत चौगुले, स.फौ. / सुरेश हिंगे, पो हवा / राजु जाधव, संदिप सोनवणे, पोना / हनुमंत कांबळे, भैरोबा यादव, म.पो.ना. भाग्यश्री जमदाडे, पोकॉ / नितीन गुंजाळ, निखील वर्पे, प्रदिप राळे, सुनिल भागवत, संदिप गंगावणे, मंगेश फापाळे महेश कोळी, यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई विनोद शेंडकर हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy