“पंच प्रण शपथ” घेण्यासाठी निघालेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसाला ट्रकची धडक.

Share This News

बातमी 24तास, मराठी न्यूज वेब पोर्टल(वृत्त सेवा)

पुणे नाशिक महामार्गावर गवते वस्ती जवळ आज सकाळी वाहतूक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला हायवा गाडीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात वाहतूक पोलिसाचा रस्त्यावर पडून जागीच मृत्यू झाला.

सकाळी कामावर जाताना हा अपघात झाला आहे. योगेश गणपत ढवळे ( वय ४०) असे या अपघातात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ढवळे हे ” पंच प्रण शपथ” घेण्यासाठी कार्यालयात जात होते. त्यावेळी ही दुर्देवी घटना घडली.

“पंच प्रण शपथ” हा सोहळा देशभरातील सरकारी कार्यालयामध्ये केंद्र सरकारच्या ” मेरी माती मेरा देश” या कार्यक्रमाचा भाग म्हणून आयोजित केला जात आहे. त्यासाठीच ढवळे जात असताना ही घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळच्या सुमारास वाहतूक विभागातील पोलीस कर्मचारी योगेश गणपत ढवळे हे आपल्या दुचाकी वरून कामावर जात होते.पुणे नाशिक महामार्गांवर गवते वस्ती नजिक मोटार सायकल क्र. एम एच १४ सी एफ ६४६० या गाडीवरून येत असताना एच पी पेट्रोल पंपासमोर हायावा गाडी क्र. एम एच १४ जे एल ९९३९ हिने ढवळे यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.त्यांच्या अपघाती जाण्याने वाहतूक पोलिसांमध्ये धक्का बसला आहे. योगेश हे सर्वांशी मिळून मिसळून राहणारे असे व्यक्तिमत्व होते. योगेश ढवळे यांच्या अकाली निधनामुळं त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy