काळुस,कौटकरवाडी, टेमगिरवाडी ग्रामस्थांचा वहीवाटीचा रस्ता खुला करण्याची चाकण नगरपरिषद कडे मागणी

Share This News

बातमी 24तास Web News

(वृत्त सेवा) काळुस,कौटकरवाडी, टेमगिरवाडी ग्रामस्थांचा वहीवाटीचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी चाकण नगरपरिषद कडे मागणी करण्यात आली,चाकण नगरपरिषद हद्दीतील जमीन गट नंबर 675 मधून जाणारा वहिवाटीचा सध्या अडविलेला रस्ता खुला करून सदर रस्ता वाहतुकीचा पक्का रस्ता होण्यासाठी ग्रामीण मार्ग 97 बाबत काळूस,कौटकरवाडी टेमगिरवाडी येथील ग्रामस्थांनी चाकण नगरपरिषदचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

मागील महिन्याभरात सदर गट नंबर 675 मधील रस्ता जागा मुळ मालकांकडून अन्य व्यक्तीने खरेदी करून सदर लोकवस्तीच्या वापरातील रस्ता सिमेंटचे पोल, काटेरी झुडपे व मोठ्या प्रमाणात मुरूम टाकुन यां रस्त्याचा वापर वाहतूक व पायी जाण्या येण्यासाठी अडविण्यात आला असून काही प्रमाणात रस्त्याचे अस्तित्वच नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.तरी तो रस्ता खुला करण्यात यावा करावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य संदीप टेमगिरे,अनिता कौटकर,किरण पवळे,विनायक पवळे,संपत टेमगिरे,कुलदीप कौटकर,शंकर कौटकर,दत्तात्रय कौंटकर,चेतन कौंटकर,सदाशिव कौटकर,वामन कौटकर,बाळू टेमगिरे,संतोष कौटकर,प्रवीण टेमगिरे,अजित कौटकर आदीनी एका निवेदनाद्वारे केली असून यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनी सांगितले की,सदर प्लॉटींग करणाऱ्याला नोटीस बजावली आहे. त्यांच्या योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर योग्य ती कारवाई केली जाणार आहे. चाकण शहाराच्या पूर्व भागातील काळूस गावच्या वाड्यावस्त्यांवतील नागरिकांना शिक्षण, आरोग्य,रोजगार आणि शेतीमालाची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या चाकण शहराकडे जाण्यासाठी कौटकरवाडी- टेमगिरवाडी राक्षेवाडी तर्फे चाकण या मार्गे 11 ते 12 किमी इतके अंतर पार करावे लागते तर याला पर्यायी रस्ता असलेल्या कौटकरवाडी, आगरकरवाडी तर्फे चाकण मार्गे चाकण शहर व मार्केट यार्ड येथे शेतमाल घेऊन येण्यासाठी अवघ्या 3.3 किमी इतके अंतर पार करावे लागते.सदरचा आगरकरवाडी तर्फे चाकण हा मार्ग पुर्वापार वहीवाटीचा असुन सन 2000 साली व सन 2009 साली या ठिकाणी जि.प. निधीच्या माध्यमातून होडीची सोय करण्यात आली होती.पावसाळ्यात नदीला पुर आल्यानंतर होडी वाहून गेल्याने गरजेपोटी आम्ही स्थानिक नागरिकांनी 2010 साली या ठिकाणी लोकसहभाग, श्रमदान व लोकवर्गणीच्या माध्यमातून पुल बांधला असुन या मार्गे मोठ्या प्रमाणात दळणवळण आता चालू आहे. तसेच ऑगस्ट 2021 मध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (P.M.R.D.) द्वारा विकास आराखड्यात या मार्गास काळूस हद्दीत 24 मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित केलेला आहे परंतु न.प. हद्दीतील जमिन गट नं 675 मधुन पुर्वपार वाहिवाटीत असलेला व प्रजिमा-20 पर्यंत असलेला तसेच चाकण हद्दीतील ग्रामीण मार्ग 97 जिल्हा एकात्मिक रस्ते योजने नुसार दाखवायचा राहून गेलेला 300 मीटर लांबीचा रस्ता चाकण न.प.च्या डी. पी. आर. मध्ये प्रस्तावित करायचा राहिला असुन नियोजन दृष्टीने रस्त्यामध्ये सलगता येण्याच्या अनुषंगाने तो रस्ता मार्ग पीएमआरडीए नुसार प्रस्तावित होणे गरजेचा आहे, तसे नगरपरिषद द्वारा व्हावे ही विनंती असून परंतु गेले महिन्याभरात सदर रस्ता जागा मुळ मालकांकडून अन्य व्यक्तीने खरेदी करून त्याने सदर रस्ता सिमेंटचे खांब , काटेरी झाडे व मोठ्या प्रमाणात मुरूम टाकुन अडविण्यात आला आहे.

याबाबत आम्ही त्यांना विनंती केली की, रस्ता अडवू वा नष्ट करू नका तथापि सदर जागेमध्ये मला प्लॉटिंग करावयाचे असे सदर इसम सांगत असून आमचा त्यांच्या प्लॉटिंगच्या व्यवसायला काहीएक विरोध नसुन आमचा पुर्वापार चालत आलेला रस्ता अडवू नये व सदर प्लॉटिंगचे सांडपाणी त्यांनी प्रक्रिया करून शुध्दीकरण करून नदीत सोडावे, विना प्रक्रिया सांडपाणी आम्ही सोडू देणार नाही हे सांगितलेने चिडून त्यांनी आमचा रस्ता अडवून नष्ट केला की काय अशी शंका आम्हाला येते तसेच आधीच चाकण न.प.हद्दीतील व आजूबाजूच्या वाडया वस्त्यांचे सांडपाणी ओढ्यामार्फत आमच्या कौटकरवाडीच्या हद्दीत भामा नदीपात्रात विना प्रक्रिया सोडले जात आहे त्यामुळे आम्हाला शेतीसाठी दुषित पाणी वापरावे लागत असुन पिण्यासाठी हे पाणी वापरता येत नाही. तसेच जमिन गट नं 675 मधील प्लॉटिंग झाल्यास तेथील सांडपाणी देखील आता नदीपात्रात सोडले जाणार आहे तरी जलशुद्धीकरणासाठी या ठिकाणी एस. टी. पी. प्रकल्प उभारण्यात यावा. महत्वाचे म्हणजे जमिन गट नं 675 मधुन पुलाकडे जाणारा रस्ता चाकण न. प. हद्दीतील स्मशानभुमीकडे देखील जात असून स्मशानभुमीची जागा बदलून पुलाच्या पुर्व बाजुला सरकारी जागेत घ्यावी त्या ठिकाणी माझी वसुंधरा अभियानांतर्गत झाडे लावून सुशोभिकरण करण्यास वाव आहे. तसेच या ठिकाणी पक्का व कायमस्वरूपी रस्ता अत्यंत गरजेचा आहे. हा मार्ग आमच्या पुर्वापार वाहिवाटीचा व आमच्यासाठी अत्यंत सोयीचा असून चाकण न.प. हद्दीतील जमिन गट नं 675 मधुन जाणारा रस्ता रस्ता बंद झाल्यास काळुस हद्दीतील कौटकरवाडी, टेमगिरेवाडी, खैरेवाडी व जवळपासच्या परिसरासाठी दुसरा पक्का पर्यायी रस्ता उपलब्ध नाही. आगरवाडी मार्गे रस्त्याची सोय न झाल्यास आमच्या भागातील विद्यार्थ्यांना प्राथमिक, विद्यालयीन व उच्च शिक्षण घेण्यापासुन वंचित रहावे लागणार असुन तातडीच्या काळात आरोग्याच्या सुविधा मिळणार नाही तसेच रोजगार व इतर गरजा भागविण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागणार आहे. तरी सदर परिस्थितीची शहानिशा, पंचनामा करून व नागरिकांची गरज ओळखून गट नं 675 मधील पुर्वापार वहिवाटीचा पक्का रस्ता भामा नदी पूलापर्यंत व्हावा , अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy