समृद्धीवर अपघात, १७ लोक मृत्यूमुखी, शासनाकडून ५ लाखांची मदत जाहीर

Share This News

बातमी 24तास(वृत्त सेवा)ठाणे : शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून दुर्दैवी अपघात झाला. या दुर्घटनेत आत्तापर्यंत १७ जण मरण पावले असून मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असून जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश दिले आहेत.एनडीआरएफचे पथक याठिकाणी पोहचले असून बचाव कार्य सुरु असून पावसाळा असल्याने अधिक खबरदारी घेण्यात येत असल्याचे समजते. समृध्दी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना मध्यरात्रीच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली आहे. ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांनी दिलेल्या माहितीनुसार सरलांबे (ता. शहापुर) या ठिकाणी समृद्धी महामार्गावरील पूलाचे काम सुरू असताना महामार्गावरील क्रेन तेथील काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर पडून अपघात झाला आहे. ही घटना रात्री ११ ते १२ च्या दरम्यान घडल्याची माहिती आहे. पडलेल्या क्रेनखाली आणखी कामगार दबलेले असून त्यांना काढण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती शहापूर पोलिसांनी दिली आहे. पुलाचे काम सुरू होते तेव्हा ३० ते ४० कामगार घटनास्थळी होते. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy