रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी दिघी आळंदी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार उतरले रस्त्यावर

Share This News

बातमी 24तास

(प्रतिनिधी,अरिफ शेख) दिघी आळंदी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत . अक्षरशः रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी मुरूम टाकत काम करताना नागरिकांना शहाजी पवार आढळले आहेत तसेच रस्त्यावर असलेल्या मोठ्या प्रमाणात या खड्ड्यांमुळे वाहतूक ठप्प होत होती.

रहदारीत अडथळा होत होता याचे वारंवार वरून फोन येत होते आणि प्रशासकीय बाबी सांगण्यापेक्षा अडचणी दूर करणे महत्त्वाचे आहे या स्वरूपात त्यांनी हे काम केले आहे असे मत त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले मुळात या कामामुळे दिघे आळंदी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या नावाची मोठ्या प्रमाणात आळंदी करांमध्ये कौतुकास्पद चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy