जबरी चोरी व इतर गुन्हयातील ५ फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद

Share This News

बातमी24तास(वृत्त संस्था)

बारामती शहर पोलीस स्टेशन अंतर्गत जबरी चोरी व इतर गुन्ह्यातील फरार आरोपीना जेरबंद करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, यांनी फरारी आरोपी पकडणे साठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आदेश दिले होते. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली योग्य त्या सूचना देऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले होते.त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी पथके तयार करून बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. ४४५/२०२०, भा.द. वि. कलम ३९२, ४५७, ३४ मधील पाहिजे असलेला आरोपी १)विकेण उर्फ विक्या उर्फ हुक्या वय ३० वर्षे, रा. वरकुटे खुर्द कुंभार टेक निमगाव केतकीच्या जवळ ता. इंदापूर, जि.पुणे २) गु.र.नं. ४४५/२०२०, भा.द.वि. कलम ३९२, ४५७, ३४ मधील पाहिजे असलेला आरोपी विकेण उर्फ विक्या उर्फ हुक्या शिवा काळे, वय ३० वर्षे, रा. वरकुटे खुर्द कुंभार टेक निमगाव केतकीच्या जवळ ता. इंदापूर, जि. पुणे तसेच १) दौंड पोलीस स्टेशन गु.र.नं. २१ / २०१७, भा.द.वी. कलम ४५७, ३८०, २) गु.र.नं. ५९/२०१७, भा.द.वी. कलम ४५७, ३८०, ३) गु.र.नं. ६० / २०१७, भा.द. वी. कलम ४५७, ३८० मधील आरोपी सचिन आनंता उर्फ आत्या भोसले, रा. धुमाळ वस्ती आलेगाव, ता. दौंड, तसेच १) राजगड पोलीस स्टेशन गु.र.नं. २८८/२०२१, भा.द.वि. कलम ३८० मधील आरोपी फैजान समीम अहमद, वय २३ वर्षे, रा. शिंदेवाडी, ता. भोर, जि. पुणे, १) हवेली पोलीस स्टेशन गु.र.नं. १६४/२०२१, भा.द.वि. कलम ३०७,१४३ आर्म अॅक्ट ४ (२७) आरोपी हितेश सुरेश मानकर, वय २३ वर्षे, रा. सांगरून ता. हवेली, जि.पुणे सदर आरोपी यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हयाची कबुली दिली.

सदरची कारवाई ही अंकित गोयल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण आनंद भोईटे, अपर पोलीस अधीक्षक, मितेश घट्टे, अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली अनमोल मित्तल, परी सहायक पोलीस अधीक्षक / प्रभारी अधिकारी हवेली पोलीस स्टेशन, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, अविनाश शिळीमकर, पोसई प्रदिप चौधरी, पोलीस उपनिरीक्षक अमित सिदपाटील, सहा फौज बाळासाहेब कारंडे, सहा फौज रविराज कोकरे, पो.हवा अभिजीत एकशिंगे, पो. हवा. स्वनिल आहोवळे, पोहवा / राजु मोमीन, पोहवा / अतुल डेरे, पो. हवा / सचिन घाडगे, पो.हवा / आसिफ शेख, पो.हवा / अजित भुजबळ, पोना / अमोल शेडगे, पोना / बाळसाहेब खडके, पोकों / मंगेश भगत यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy