राज्यात अखेर मान्सून सक्रिय राज्यातील १३ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

Share This News

बातमी 24तास

(मुंबई प्रतिनिधी) राज्यात सगळ्यांना वाट पाहायला लावणारा मान्सून अखेर सक्रीय झाला असून कोकण नंतर मान्सूनने महाराष्ट्राच्या आणखी काही भागांमध्ये हजेरी लावली आहे. पुढच्या काही तासांमध्ये राज्यातील १३ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. केरळमध्येच उशिराने दाखल झालेला मान्सून अखेर आता सक्रीय झाला असून महाराष्ट्रातही मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. कोकणात खोळंबलेला मान्सून आता पुन्हा एकदा सक्रिय झाला असून काल पावसानं विदर्भासह अनेक जिल्ह्यांमध्ये हजेरी लावली. तर आज मुंबई आणि पुण्यातही मान्सूनने जोरदार सलामी दिली. पुढच्या ३-४ तासांसाठी राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.राज्यात मान्सूनच्या प्रवासाला सुरुवात, कोकणात ऑरेंज अर्लट तर मुंबई, पुण्याला यलो अलर्टराज्यातील अनेक भागात मान्सून बरसला असून अनेक दिवासांच्या उष्णते पासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळत आहे.

दरम्यान हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार, कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड,  रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अर्लट (Orange Alert) देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात हवामान खात्याकडून यलो अर्लट (Yellow Alert) देण्यात आला आहे. मुंबई पुण्यासह राज्यात अनेक भागात अनेक दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या पावसाने अखेर हजेरी लावली आहे.दरम्यान पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.  तसेच विदर्भ आणि मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाने दमदार एन्ट्री केली आहे. तर पुढील तीन ते चार दिवस कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसामुळे तापमानात कमालीची घट झाल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. तर नाशिक, साताऱ्यामध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर नवी मुंबई, पालघर जिल्ह्यात देखील रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचं चित्र सध्या आहे.  पावसाच्या हजेरीमुळे बळीराजा देखील सुखावल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. ऑरेंज अलर्ट म्हणजे नेमकं काय? जिल्ह्यांना देण्यात आलेला हा अर्लट म्हणजे काय हा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. म्हणजे या जिल्ह्यामंध्ये नेमकी परिस्थिती कशी राहणार हे या अलर्टवरुन आपल्या लक्षात येण्यास मदत होऊ शकते.  कोकणात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पाऊस असेल ठिकाणी  हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात येतो.  ऑरेंज अलर्टमध्ये, रेड अलर्टपेक्षा थोडी कमी धोकादायक स्थिती असते.  ऑरेंज अलर्ट म्हणजे मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता त्या भागामध्ये असते.

यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?

  यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिलेला इशारा असतो. हा इशारा सतर्कतेसाठी देण्यात येतो.  जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. यलो अर्लट म्हणजे त्या भागात साधारण ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असते. ज्या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात येतो त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धोकादायक परिस्थिती नसते. राज्यात कधी कुठे आणि कसा पाऊस? राज्यात पुढचे 5 दिवस मान्सून बहुतांश भागात सक्रिय असण्याची शक्यता. कोकणात व विदर्भात काही दिवस मुसऴधार ते अती मुसऴधार,पुणे सातारा नाशिक ही मुसऴधार ते अती मुसऴधार,मराठवाडा मध्ये ही पावसाचा जोर राहील.दरम्यान राज्यात पुढील 5 दिवस म्हणजेच 25 ते 29 जून दरम्यान बहुतांश भागात पाऊस सक्रीय असण्याची शक्यता ही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि विदर्भात काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज सांगण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. हीच परिस्थिती नाशकातही असणार आहे. तर मराठवाड्यात पावसाचा जोर राहील.

*🟥टाटा स्काय ची धमाकेदार ऑफर ; लगेच फायदा घ्या फक्त 1500 रु मध्ये बसवा कनेक्शन आणि महिना भर मोफत*🟥 *ज्याच्याकडे टाटा प्ले आहे आणि त्याला त्याचा पॅक चेंज करायचा आहे तर मला कॉल करा 318 मध्ये सगळे चैनल ( एचडी चॅनल) पाहायला मिळतील मला कॉल करा आणि तुमचा टाटा प्ले चा पॅकेज चेंज करून घ्या**📞अधिक माहितीसाठी आताच सम्पर्क करा:**📱9420159059**📱8796164028*…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy