इंदापूर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कामगिरी चोरीस गेलेल्या २१  मोटारसायकल हस्तगत, तिघांना अटक

Share This News

बातमी 24तास

(क्राईम रिपोर्टर ) मागील काही महिन्यापासून इंदापूर पोलीस ठाणे हददीतून मोटारसायकल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. पूणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, आनंद भोईटे, अपर पोलीस अधीक्षक, आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, यांनी बैठक घेवून मोटारसायकल चोरीचे गुन्हे. उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या.त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबदारी गुन्हे शोध पथकास दिली होती.

याप्रमाणे गुन्हे शोध पथकाने पोलीस ठाणे अभिलेखावरील मोटारसायकल चोरी करणारे आरोपी तसेच इंदापूर शहर परिरातील अनेक सी.सी.टि.व्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून तांत्रिक माहिती वरून संशयीत १) विनोद महादेव पवार, वय २४ वर्षे, रा. सरस्वतीनगर इंदापूर, जि. पुणे, २) अतुल मारूती काळे, वय १९ वर्षे, रा. निमगाव, ता. माढा, जि. सोलापूर यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता सदर आरोपी यांनी इंदापूर, टेंभूर्णी, कुर्डवाडी, फलटण परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याचे कबुल करून त्यापैकी काही मोटारसायकल, ३) योगेश मच्छिंद्र सुरवसे, वय ३२ वर्षे, रा.बार्डी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर यास विक्री केल्या असल्याची माहिती दिल्याने नमुद इसमासही ताब्यात घेवून तिन्ही आरोपी यांच्याकडून आता पर्यंत पल्सर, युनिकॉर्न, स्प्लेन्डर, एच.एफ डिलक्स, शाईन अशा वेगवेगळया कंपनीच्या अंदाजे ७ लाख रूपये किंमतीच्या २१ मोटारसायकल हस्तगत करण्यात आलेल्या असुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.इंदापूर पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्रमांक१) २८/२०२३, भादवि कलम ३७९२) २२१ / २०२३ भादवि कलम ३७९ ३) ३६६ / २०२३, भादवि कलम ३७९ ४) ५४८/२०२३ भादवि कलम ३७९५) ६३२ / २०२३ भादवि कलम ३७९६) ६३५/२०२३ भादवि कलम ३७९७) २६२ / २०२२ दवि कलम ३७९ ८) २५५ / २०२२ भादवि कलम ३७९८) २५५ / २०२२ भादवि कलम ३७९९) ४०७/२०२२ भादवि कलम ३७९१०) ३२१ / २०२२ भादवि कलम ३७९ ११) ५२७/२०२२ भादवि कलम ३७९१२) ५५७/२०२२ भादवि कलम ३७९१३) ७७३ / २०२२ भादवि कलम ३७९१५) ११४५ / २०२२ भादवि कलम ३७९भादवि कलम ३७९१४) ८४५/२०२२ भादवि कलम ३७९ १६) फलटण ग्रामीण पोलीस ठाणे जि. सातारा २३/२०२२, १७) कुर्डवाडी पोलीस ठाणे जि.सोलापुर ३३४ / २०२१, भादवि कलम ३७९ | १८) टेंभुर्णी पोलीस ठाणे जि.सोलापर ७३/२०२२ भादवि कलम ३७९१७) कुर्डवाडी पोलीस ठाणे जि.सोलापुर ३३४ / २०२१, भादवि कलम ३७९ १८) टेंभूर्णी पोलीस ठाणे जि. सोलापुर ७३ / २०२२ भादवि कलम ३७९ इत्यादी गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहेत. तिन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याच्या शक्यता आहे.सदरची कामगिरी ही अंकित गोयल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, आनंद भोईटे, अपर पोलीस अधीक्षक, गणेश इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोनि / दिलीप पवार, सपो नि/ योगेश लंगटे, सहा. फौज / प्रकाश माने, ज्ञानेश्वर जाधव, पौना / सलमान खान, पोकॉ/ नंदू जाधव, गजानन वानोळे, होमगार्ड लखन झगडे यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy