गुरुवर्य विद्यावत्सल सर यांच्या जयंती निमित्त एस एस सी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा चाकण येथे संपन्न

Share This News

बातमी 24तास (प्रतिनिधी )अखिल भारतीय विद्यार्थी सेना, किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान च्या वतीने रविवार दिनांक 18 जून 2023 रोजी गुरुवर्य विद्यावत्सल सर यांच्या जयंती निमित्त एस एस सी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न झाला. श्री दामोदर पूजन तसेच शिवप्रतिमा पूजन करून गुरुवर्य सर यांची प्रतिमा पूजन करण्यात आली. तसेच एस.एस.सी.गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार श्रीमती सौदामिनी राव( आक्का) यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच पठारवाडीतील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना वह्याचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाला किल्लेदार फिरंगोजी नरसाळा प्रतिष्ठान व पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. किरण झिंजुरके, डॉ. गिरीश धडफळे, विकास गोरे. ( स्व आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठान),सौ प्रमिलाताई गोरे(मुख्याध्यापीका.ज्ञानवर्धीनी), डॉ. गणपत गेठे, ह भ प अशोक महाराज पवार, प्रा. राजू दिक्षित सर, राजू खरमाटे सर,ॲड. किशोर झिंजुरके, अविनाश देशमुख, जयेंद्र नवगिरे, रवी शिंदे,ॲड. अनंत देशमुख, कु. सिद्धेश चिंचवडे, राहुल वाडेकर, विनोद जंद. तसेच अखिल भारतीय विद्यार्थी सेना व किल्लेदार स्मारक प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व चाकण मधील 20 प्रशालेमधील प्रथम, द्वितीय, तृतीय विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy