पुण्यात सिंहगडावर पर्यटकांवर सकाळी मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात ५९ पर्यटक जखमी

Share This News

बातमी24तास(पुणे प्रतिनिधी) रविवारची सुट्टी असल्याने सकाळपासूनच सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी होती. वाहनतळा वर वाहने लावण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने घाट रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहन तळापासून पुणे दरवाजापर्यंत आणि गडावरील पायवाटांवर पर्यटक चालत होते. तेवढ्यात अचानक टिळक बंगल्याजवळ असलेल्या तोफेच्या पॉईंट परिसरात अनेक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. सकाळपासून या परिसरात मधमाशा घोंगावत होत्या. या घटनेत सुमारे ५९ पर्यटक जखमी झाले असल्याची माहिती आहे. सिंहगडावरील टिळक बंगल्याजवळ असलेल्या तोफेच्या पॉईंट परिसरात अनेक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. हल्ल्यात अनेक तरुण-तरुणी जखमी झाले आहेत. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सकाळपासूनच सिंहगडावर पर्यटकांनी मोठी गर्दी होती. अशातच मधमाशांनी हल्ला केल्यानं पर्यटकांची मोठी धावपळ उडाली होती.सिंहगडावर असणाऱ्या टिळक बंगल्याजवळ असणाऱ्या तोफेच्या पॉईंट परिसरात अनेक पर्यटकांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्यात अनेक तरुण-तरुणी जखमी झाले आहेत. गडावरील पुणे दरवाजा पासून पुढे मधमाशा घोंगावत असताना पर्यटकांच्या सुरक्षेबाबत वन विभागाने मात्र कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसून आल्या नाहीत.सुट्टी असल्याने सिंहगडावर तुफान गर्दी झाली होती. घाटरस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळपासून सातत्याने या परिसरात मधमाशा घोंगावत असताना पर्यटकांच्या सुरक्षेबाबत वन विभागाने योग्य खबरदारी न घेतल्याने अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. सिंहगडावर आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी कोणतीही व्यवस्था नाही. सुट्टीच्या दिवशी सरासरी पाच ते दहा हजार पर्यटक येतात. मधमाशांचा हल्ला, दरड कोसळणे किंवा इतर दुर्घटना घडल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत पर्यटकांचा जीव वाचविण्यासाठी कोणतीही व्यवस्था सिंहगडावर नाही.पर्यटकांच्या सुरक्षेबाबत वन विभागाने योग्य खबरदारी घेतली नसल्याचा आरोप पर्यटकांनी केला. यात सुमारे ५९ पर्यटक जखमी झाले. त्यामुळं पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली.जखमींना त्वरित उपचारांसाठी घेऊन जाण्यासाठी साधी रुग्णवाहिकाही उपलब्ध नसते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेऊन सिंहगडावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शिवप्रेमी आणि पर्यटकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy