

बातमी 24तास ( वृत्त सेवा )चाकण नगरपरिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्र. 1 मधून अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले श्री. रोनक विनोद गोरे यांनी प्रभागातील माजी उपनगराध्यक्ष श्री. राजेंद्र गोरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाशदादा वाडेकर तसेच अशोकशेठ भुजबळ, माणिकशेठ गोरे, नितीनभाऊ गोरे, बिपीन रासकर, संदेश गीते, अशोकआबा बारवकर आणि गोरकक्षनाथ कांडगे यांच्या विनंतीनुसार समंजस भूमिका घेतली आहे.
स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी, त्यांनी प्रभाग क्र.1 मधील शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. प्रकाश लक्ष्मण गोरे यांना तसेच नगराध्यक्षा पदासाठी श्रीमती मनिषाताई सुरेशभाऊ गोरे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.