
बातमी 24तास
(पिंपरी चिंचवड प्रतिनिधी, बद्रीनारायण घुगे) श्रीक्षेत्र देहूतील श्री संत तुकाराम महाराज महाराज मंदिराच्या प्रांगणात दिपावली भक्ती -संगीत महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात कार्यक्रमात गुरुवारी भाऊबीजेला सकाळी ‘भक्तीरस तुकोबांचा’ हा संगीतमय कार्यक्रम युवा गायिका संगीत विशारद काजल भेगडे-काटे यांनी सादर केला .
त्यांनी ‘भक्तीरस तुकोबांचा’ या कार्यक्रमात ॐ नमोजी आद्या ,राम कृष्ण हरि ,सुंदर ते ध्यान, जय जय विठ्ठल रखुमाई ,उजळले भाग्य आता , बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, वेढा रे पंढरी या तुकोबारायांच्या रचना तसेच भाग्यदा लक्ष्मी बारम्मा हा कन्नड भाषेतील अभंग हरि म्हणा तुम्ही गोविंद म्हणा भजन , आल्या पाच गवळणी ही गौळण सादर केल्यानंतर सोनियाचा दिवस आजि अमृते पाहिला या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली .
दरम्यान गायिका श्रावणी भेगडे यांनी वेढा रे पंढरी ही रचना सादर केली. पखवाज साथ हभप भीमराव महाराज हांडे , तबला साथ अजित लोहर , संवादिनी साथ केशवबाबा भेगडे , गायन साथ संगत श्रावणी भेगडे , मधूश्री भेगडे टाळ साथ प्रज्वल भेगडे , ओम चांदेकर यांनी केली . कार्यक्रमाचे निवेदन प्रथमेश भेगडे यांनी केले .