
बातमी 24तास
(प्रतिनिधी आरिफ शेख ) आळंदी/ तीर्थक्षेत्र आळंदी मधील सिद्धबेट हे श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या वास्तव्य असल्याने पावन झालेली जागा आहे.याठिकाणी वारकरी संप्रदायाचा करणारे विद्यार्थी पखवाज सराव करण्यासाठी जात असतात. सकाळचे सुमारास मारहाण झालेला विद्यार्थी आणि इतर दोन वारकरी संप्रदायातील विद्यार्थी पखवाज नित्यनियम सरावासाठी या ठिकाणी गेलेला होता. त्यावेळी तीन व्यसनाधीन तरुण येथे होते.त्यांनी सदर विद्यार्थ्यास पखवाज वाजू नको म्हणून सांगितले. त्यानंतर बसलेल्या तीन विद्यार्थ्यांनी सराव थांबवला आणि त्यानंतर थोड्यावेळाने पुन्हा सराव चालू केला.

त्यावेळी सदर व्यसनाधीन तरुण पुन्हा तेथे येऊन त्यांना दम देऊ लागले.आणि पखवाज बंद करण्यास सांगितले. दरम्यान मंदिरात दर्शनाला जाण्याची वेळ झाली.म्हणून सदर विद्यार्थी आवराआवर करून निघत असताना त्यापैकी एका तरुणाने या विद्यार्थ्याला चापट मारली.परंतु शिक्षण घेणाऱ्या वारकरी विद्यार्थ्याने सदर घटनेकडे दुर्लक्ष केले.आणि निघून जाण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा त्या विद्यार्थ्याने मारहाण केली. हा काही केल्या ऐकत नाही.अशा परिस्थितीमध्ये सदरच्या विद्यार्थ्याने शेजारी असणाऱ्या खाजगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आश्रय घेतला.परंतु सदर व्यसनाधीन तरुण त्या ठिकाणी धावत जाऊन दरवाज्यावर जोरजोरात थापा मारू लागले. आतील वारकरी शिक्षण घेणाऱ्या इतर घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी दरवाजा उघडला.असता व्यसनाधीन तरुणांनी हातातील दांडक्याने बेदम मारहाण त्या विद्यार्थ्याला केली आहे.सदरची घटना वारकरी शिक्षण संस्थेमध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये चित्रित झालेले आहे. घाबरलेल्या आणि भेदरलेल्या अवस्थेमध्ये अशी घटना घडल्यानंतर वारकरी संप्रदायातील विद्यार्थी आणि या विद्यार्थ्याला मदत करणारे वारकरी क्षेत्रातील इतर ह भ प मंडळीने आळंदी पोलीस स्टेशन येथे धाव घेतली आहे.तसेच एक आरोपी हा मिळून आला असून, इतर दोन आरोपी फरार असल्याचे समजते.दरम्यान तपास करत असणाऱ्या पोलीस कर्मचारी यांनाही सदर व्यसनाधीन तरुण अरे रवी ची भाषा करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. आळंदीच्या नावलौकिकामध्ये वारकरी संप्रदायामुळे मोठी भर पडते.माऊलींच्या या आळंदीमध्ये नित्यनियमाने सराव करणारे विद्यार्थ्यांना झालेली मारहाण ही अतिशय खेदाची बाब आहे.