बातमी24तास
प्रतिनिधी आरिफभाई शेख
आळंदी/श्री तीर्थक्षेत्र आळंदी देवाची अतिशय पवित्र पुण्यभूमी महाराष्ट्राच्या विविध भागातून लोक दर्शनाला येतात एवढेच काय परदेशी लोकही आळंदी पाहण्यासाठी येतात. लहान मुलांवर खाजगी शिक्षण संस्थेमध्ये अत्याचाराच्या घटना ताज्या असताना आता पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे.
आळंदीतील इंद्रायणी नगर येथील खाजगी वारकरी शिक्षण संस्था संगीत शिकवणी चे धडे देणाऱ्या शिक्षकाने बारा वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक संबंधाची मागणी केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत भेदरलेल्या अवस्थेत असणाऱ्या अल्पवयीन मुलाने खाजगी वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक कडे या शिक्षकाची तक्रार केली. मात्र सदर संस्थापकानेही या गोष्टीकडे दुर्लक्ष केले त्यामुळे घाबरून जाऊन या मुलाने पोलीस स्टेशन गाठले आणि दिघी आळंदी पोलीस स्टेशन येथे या नराधमाची तक्रार दाखल करत सदर घटनेला वाचा फोडली आहे.
मध्यंतरीच्या काळात रूपाली चाकणकर यांनी सर्व शासकीय विभागांची झाडाझडती घेतली. 48 तासाच्या आत कारवाईचे आदेश दिले मात्र खाजगी वारकरी शिक्षण संस्थेचा अहवाल गुलदस्त्यातच राहिला. दोशी किती आरोप काय हे अजूनही जाहीर नाही. यावर संताप आणणारी घटना म्हणजे पुन्हा एकदा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अल्पवयीन मुलावर झालेला अत्याचार, यामुळे आळंदीकर ग्रामस्थ मात्र कमालीचे चिडलेले आहेत. मुळात वारकरी शिक्षण घेण्यासाठी आपल्या लेकरांना माऊलींच्या आळंदी मध्ये पाठवणारे मायबाप आळंदीच्या पावित्रेला विचारात घेऊन पाठवतात. मुलांनी धर्माचे शिक्षण घ्यावे. संस्कार व्हावेत अशी या गोरगरीब आई-वडिलांची इच्छा असते. मात्र विना कष्टाचा मिळालेला पैसा प्राप्त करणाऱ्या खाजगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये त्या चिमुरड्या लहान मुलांवर अत्याचार होत आणि आरोपी उजळ माथ्याने फिरतात ही आळंदीच्या धार्मिकतेला कलंक लावणारी घटना आहे. आळंदीकर ग्रामस्थ पवित्र आणि धर्माच्या संस्काराची मात्र जपणूक नक्की करतात. याच निर्मळ भावनेतून आळंदीकर ग्रामस्थांचा संताप अनवर झालेला आहे. या माजूरड्या पांघरून घेतलेल्या लोकांचं करायचं तरी काय, या चिंतेने आळंदीकर ग्रामस्थ कमालीचे संतापलेले आहेत. निवेदने देऊन झाली मात्र अत्याचार अन्याय थांबत नसतील तर पुढे या गोष्टी कोणत्या थराला जातील याचा विचार न केलेला बरा. स्वर्गीय ह भ प जयराम महाराज भोसले यांनी नितीनियम पाळत वारकरी शिक्षण संस्था चालून दाखवली आजही ती चालू आहे.तसेच परमपूज्य जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था जगाच्या पाठीवर नाव काढत आहे. मात्र या सर्व गोष्टीचा या निर्लज्ज महाराज बनून फिरणाऱ्या व्यक्तींना सोयरसुतक नाही. आश्चर्याची बाब अशी की देहू फाट्यावरील इंद्रायणी नगर मध्ये या खाजगी वारकरी शिक्षण संस्थेच्या महाराजावर तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये अत्याचारीत मुलगा गेला असता तेथे सदर अपराधी महाराजाला साथ देण्यासाठी त्यांचे सवंगडी गोळा झाले होते अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई कुऱ्हाडे यांनी दिली. त्यांनी सदर प्रकार पाहिल्यानंतर त्यांचा संताप अनावर झाला आणि राग व्यक्त करतात सदर महाराज मंडळी ताबडतोब पळून गेली असे ते सांगतात. दरम्यान दिघी आळंदी पोलीस स्टेशन मध्ये या गुन्हेगार महाराजांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आली असून गुन्हा दाखल झालेला आहे. आणि सदर महाराज यास अटक करून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिघी पोलीस स्टेशन ढेरे करत आहेत. विषय असा की किती तक्रारी होणार आणि किती दिवस हे असेच चालणार कदाचित या नरादामांचे बळी ठरलेले अनेक निष्पाप चेहरे आजही निपचीत पडून आहेत आणि आधाराची वाट पाहत आहे. येणारा धमाल करायचे तरी काय आळंदीकर यांचा संताप अनावर आहे.येणाऱ्या काळामध्ये महिला व बालविकास आळंदी पोलीस संयुक्त विद्यमानाने केलेल्या वीस समित्या यांची अर्धी वारकरी शिक्षण संस्था तपासणीचा अहवाल, आणि नेमकी शिक्षा कोणाला याबाबत मात्र सर्वच माहिती गुलदस्त्यात आहे आणि निष्पाप चिमूरड्या लहान बाळांना न्याय मिळणार कधी न्याय देणार कोण याबाबत मन व्यथित आहे.