आळंदी नगरपरिषद.89.51 कोटींचा अर्थसंकल्प प्रशासक कैलास केंद्रे यांचेकडून सादर

Share This News

तृतीय पंथीयांच्या कल्याणासाठी तरतूद करणारी पहिली नगरपरिषद ठरली

बातमी 24तास (प्रतिनिधी :अरिफभाई शेख) तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या आळंदी नगरपरिषदेचा 2025-26 आर्थिक वर्षाचा 6.65 लक्ष इतक्या शिलकीसह 89.51 कोटींचा अर्थसंकल्प प्रशासक तथा मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सादर केला. अर्थसंकल्पात कोणत्याही स्वरूपाची कर वाढ करण्यात आलेली नसून उल्लेखनीय बाब म्हणजे ‘तृतीय पंथीयांच्या‘ कल्याणासाठी अर्थसंकल्पात 3% तरतूद करण्यात आली आहे.अश्या स्वरूपाची तरतूद करणारी आळंदी नगरपरिषद ही कदाचित राज्यातील पहिली नगरपरिषद असावी.

महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 101 व महाराष्ट्र नगरपरिषदा लेखासंहिता 2013 चे नियम क्रमांक 404 ते 431 अन्वये आळंदी नगरपरिषद प्रशासक नात्याने मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी 2024-25 च्या सुधारित अर्थसंकल्पासह 2025-26 चे नियमित अंदाजपत्रक सादर केले.

अर्थसंकल्पात महिला,बालक,दिव्यांग,ज्येष्ठ नागरिक,तृतीय पंथीयांच्या कल्याणासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.आळंदी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नवीन पाण्याच्या टाक्या उभारणी, अंतर्गत वितरण नलिका टाकणे व इतर अनुषंगिक बाबींसाठी निधीची भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.तसेच शहरात नवीन 3 उद्यान निर्माण करणे,घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणे,नगरपरिषद शाळांचे इमारत बांधकाम,त्यांचे नुतनीकरण, संगणकी करणं यांच्यासह दर्जावर्धन करणे,शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार लक्षात घेवून सुधारित भुयारी गटार योजना व एस टी पी प्रकल्प,देहू फाटा ते मरकळ बायपास रस्ता,आळंदी नगरपरिषद नवीन प्रशासकीय इमारत उभारणी इत्यादी बाबींवर अर्थसंकल्पात भर देवून भरीव निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती आळंदी नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.

*अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये:*(1) तृतीय पंथीयांच्या कल्याणासाठी 3% तरतूद.अशी तरतूद करणारी राज्यातील पहिली नगरपरिषद(2) ज्येष्ठ नागरिक कल्याणासाठी 3% तरतूद(3) दिव्यांग कल्याणासाठी 5% तरतूद.(4) महिला व बालकांच्या कल्याणासाठी 5% तरतूद(5) मागास प्रवर्गातील नागरिकांच्या कल्याणासाठी 5% तरतूद(6) शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी 5 कोटींच्या भरीव निधीची तरतूद(7) आळंदी नगरपरिषदेच्या शाळांच्या नूतनीकरणासाठी 3 कोटींची तरतूद(8) शहराची गरज लक्षात घेवून भुयारी गटार योजनेसाठी भरीव निधीची तरतूद(9) शहरात नवीन 3 उद्याने निर्माण करण्यासाठी निधीची तरतूद(10) आळंदी नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामासाठी भरीव निधीची तरतूद

*अर्थ संकल्पिय जमा खर्चाचा तपशील:*

जमा तपशील:आरंभीची शिल्लक: 3,62,020महसुली जमा: 27,79,00,000भांडवली जमा: 61,68,50,000एकूण जमा: 89,47,50,000आरंभीच्या शिलकेसह एकूण जमा: 89,51,12,020*खर्च तपशील:*महसुली खर्च: 27,58,07,000भांडवली खर्च: 61,86,40,000एकूण खर्च: 89,44,47,000*शिल्लक: जमा- खर्च= 6,65,020*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy