
बातमी 24तास
(प्रतिनिधी आरिफ भाई शेख )आळंदीत सर्पमित्र म्हणून सेवाभावी सेवा करणारा तसेच ज्या ठिकाणी साप नाग निघेल त्या ठिकाणी कुटुंबाला आधार देत एक रुपयाची ही अपेक्षा न करता त्यांची मदत करणारा सर्पमित्र विकी उर्फ राहुल मल्लिकार्जुन स्वामी वय वर्ष 32 राहणार आळंदी देवाची याचे दुर्दैवी निधन झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की आळंदी येथे राहणारा विकी याची सर्वांशी जिवाळ्याचे संबंध होते.सर्पमित्र म्हणून शालेय जीवनापासूनच कीर्ती आत्मसात करत वेगवेगळ्या प्रकारचे साप नाग धामण पकडणे आणि निर्जन स्थळी जंगलात नेऊन सोडणे तसेच या उपक्रमासाठी एक रुपयाही मानधन न घेता हा मित्र कार्य करत होता.मात्र कोब्रा जातीच्या नागाला निर्जन स्थळ येथे जंगलामध्ये सोडत असताना या कोब्रा जातीच्या नागाचा दंश झाल्याने विकी उर्फ राहुल स्वामी यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आळंदीत घडली. कोब्रा जातीचा नाग पकडल्यानंतर निर्जल स्थळी जंगलामध्ये तो सोडावा यासाठी विकी हा गेला होता. त्यावेळी या विषारी नागाला सोडत असताना त्या नागाने विकी याला दंश केला आणि वेळेत उपचार न मिळाल्याने विकी उर्फ राहुल मल्लिकार्जुन स्वामी याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. कोब्रा नागाने दंश केल्यानंतर सर्पदंश झाल्यानंतर करावयाच्या प्राथमिक उपचारांमध्ये दंश झाल्याच्या ठिकाणी त्वचा चाकूने कापणे रक्तस्राव होऊ देणे आणि विष शरीरामध्ये भिनु नये यासाठी स्वच्छ कापडाने ते बांधणे असे प्राथमिक उपचार करणे गरजेचे होते परंतु ते न केल्याचे दिसून आले आहे. दरम्यान सर्पमित्र विकी यास ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ठराविक उपचार झाल्यानंतर पुढील उपचारा कामी पिंपरी चिंचवड येथील वायसीएम रुग्णालय येथे तातडीने हलवण्यात आले .मात्र कोब्रा जातीच्या नागा चे विष अतिशय प्रभावी असल्याने ते शरीरामध्ये भिनले गेले आणि उपचारादरम्यान विकी उर्फ राहुल मल्लिकार्जुन स्वामी याचा मृत्यू झाला आहे. आळंदीतील युवक मित्र म्हणून प्रसिद्ध असलेला विकी त्याचबरोबर लहान थोरांच्या मदतीला धावणारा कौटुंबिक जिव्हाळा असलेला विकी याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आळंदी शहरांमध्ये शोककळा पसरली आहे. विकीच्या मनमिळावर स्वभावामुळे. आळंदीत नागरिक या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करत आहेत. तसेच आळंदीत इतर सर्प मित्र यांनी हे कार्य करत असताना दक्षता घ्यावी आणि स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी यासाठी ही आळंदीतील मित्रपरिवार दुःखद अंतकरणाने भावना व्यक्त करत आहेत. विकीचे प्राण वाचवणे शक्य झाले असते परंतु कोब्रा नागदंशाचे विष पंधरा मिनिटांमध्ये उपचार न मिळाल्यास शरीर भर पसरते आणि ते निकामी करताना वैद्यकीय यंत्रणाही कमकुवत ठरते आणि त्याचाच बळी कै.विकी उर्फ राहुल मलिकार्जुन स्वामी झालेला आहे .
या मृत्यूमुळे आळंदीत मोठ्या प्रमाणात दुःख व्यक्त करण्यात येत आहे .विकी हा त्यांच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा होता .म्हातारे आई-वडील आहेत आणि बहिणीचे लग्न झालेले आहे.त्यामुळे या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवण्यासाठी तरुण युवक आळंदीकर ग्रामस्थ एकत्र आले असून आळंदीकर ग्रामस्थ या सोशल मीडिया ग्रुप वर मदतीची विनंती करण्यात आल्यानंतर यथाशक्ती आर्थिक मदत देण्याचा स्त्रोत सुरू आहे. आळंदीकर ग्रामस्थ या ग्रुप वर जमा झालेली रक्कम ग्रामस्थांच्यावतीने कैलासवासी विकी उर्फ राहुल मल्लिकार्जुन स्वामी यांच्या आई वडिलांना त्यांच्या घरी जाऊन देण्यात येणार आहे