![](https://i0.wp.com/batmi24taas.com/wp-content/uploads/2025/01/1000184563.jpg?resize=414%2C232&ssl=1)
(बातमी 24तास, प्रतिनिधी आरिफ भाई शेख) आळंदीच्या कीर्तीला लाजिरवाणी अशी घटना घडली आहे.आळंदी पुन्हा हादरली.एका खाजगी शिक्षण संस्थेमध्ये एक अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून सुमारे चार महिने हा प्रयत्न चालू असल्याची घटना उघडकीस आली आहे.
सदर घटना दिनांक 15 सप्टेंबर 2024 ते 23 जानेवारी दरम्यान आळंदीत शिक्षण संस्था थाटणाऱ्या एका महाराजाकडून सुमारे चार महिने सातत्याने घडत असल्याची माहिती समोर येत आहे. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी संबंधित आरोपीस अटक करून पुढील तपास चालू केला आहे. आळंदीकर समस्त ग्रामस्थ यांनी वेळोवेळी मीटिंग घेऊन यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. संस्था कायम बंद करा याचे पत्र व्यवहार चालू होते. आळंदीतील एक घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा दुसरी घटना उघडतेस आल्यामुळे नागरिक प्रचंड संतापलेली दिसून आले.
दरम्यान दोन अल्पवयीन शाळकरी मुलांवर अनैतिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच एका खाजगी शिक्षण संस्थेमध्ये एका मुलीचा विनयभंग केल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. आळंदीच पावित्र्य धोक्यात घालून या खाजगी शिक्षण संस्था स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचबरोबर चिमुरड्या लहान मुलांचे जीवन उध्वस्त करत असल्यामुळे पालकांनी आळंदीत शिक्षण संस्था निवडताना विचार करायला हवा या गोष्टीची समज घ्यायला हवी अशी चर्चा आळंदीत दिसून येत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा मागील चार महिन्यापासून पीडित अल्पवयीन मुलीला वेगवेगळ्या कारणावरून वेळोवेळी मारहाण करून तिच्या अंगावर आणि पाठीवर तसेच अन्य ठिकाणी नको ते स्पर्श करून विनयभंग करत होता.या गोष्टीतून असे दिसून येते की लहान मुलांना भीती दाखवत त्यांची मुस्कटदाबी करून अत्याचार करण्यात येत असल्याच्या घटना आणखी किती ?असा प्रश्न आळंदीकर ग्रामस्थ विचारत आहे. लहान मुलांना भीती दाखवत पालकांनाही तक्रार करू नये अशी परिस्थिती निर्माण केली जाते आहे की काय? तशी परिस्थिती काही खाजगी शिक्षण संस्थेमधून होत असल्याची चर्चा केली जात आहे.या भेदरलेल्या आणि घाबरलेल्या मुलांनी नेमकी तक्रार करायची कोणाकडे अशा मनस्थितीमध्ये काय जगणे त्यांच्या नशीब येत असेल देव जाणे.अशा संतापजनक घटना घडू नये आणि पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करून ही अशा घटना मध्ये मात्र वाढ होताना दिसते.कडक शासन होईल म्हणून निषेध तसेच गावकऱ्यांचा आक्रोश पाहता अत्याचार करणारे समज घेतील असे वाटत होते परंतु यांची हिंमत वाढतच चालली की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण होतेय असे म्हणण्यास पुरेसे कारण आहे.परंतु असे जर गृहीत धरले तर येणारा पुढील काळ हा आळंदीकर ग्रामस्थ सहजासहजी अशा नराधमांना सुखाने जगू देणार नाही आणि ही परिस्थिती निर्माण करण्यात हे गुन्हेगारच कारणीभूत असतील असे वाटते दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी किरण महाराज ठोसर (वय 33)राहणार आळंदी तालुका खेड जिल्हा पुणे यास पोलिसांनी पीडित मुलीच्या आईने तक्रार दिल्याच्या कारणास्तव अटक केली आहे पुढील तपास आळंदी पोलीस स्टेशन कडून केला जात आहे. मात्र अशा घटनांमुळे आळंदीकर ग्रामस्थ युवक प्रचंड संतापले असून याबाबत ठोस निर्णय घेतला जावा यासाठी आग्रही आहेत.