बातमी 24तास( वृत्त सेवा )
चाकण : जगाला सामाजिक समतेचा, न्यायाचा संदेश देणारे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला.त्यांचे विचार समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचावे यासाठी चाकण (ता.खेड ) येथे (दि.३)जानेवारीला पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण येथे संपन्न होणार असल्याचे ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.
महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव वाढवण्यासाठी पुणे जिल्ह्यातील पहिलाच पूर्णाकृती पुतळा चाकण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर उभारण्यात आला आहे.या स्मारकाचे अनावरण सोहळा देशाचे नेते शरदचंद्र पवार,माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ,उपमुख्यमंत्री अजित पवार,केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ,महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर,खासदार डॉ अमोल कोल्हे, आमदार बाबाजी काळे,माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, रामभाऊ कांडगे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे,महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले ट्रस्टचे कार्याध्यक्ष तुकाराम कांडगे,राम गोरे,महेंद्र गोरे,माणिक गोरे,संदीप सोमवंशी, अमृत शेवकरी,रुपाली जाधव,मंगल गोरे,शोभा शेवकरी, मंगल जाधव, जयश्री खेडकर,सरिता शेवकरी,मंगल शेवकरी, ज्योती वाघ, योगिनी जगनाडे चंद्रकांत गोरे,भरत आल्हाट, वैभव घुमटकर,विठ्ठल बिरदवडे, अर्जुन गोरे,अशोक शेवकरी, बबन टिळेकर,गणेश दळवी आदींनी आवाहन केले आहे.