चाकण शहरातून तळेगाव तसेच शिक्रापुर बाजूकडे जाणारी हलकी वाहने वगळून इतर जड वाहनांना ठराविक वेळेकरीता प्रवेश बंद

Share This News

बातमी 24तास(वृत्त सेवा)

चाकण तळेगाव चौकातून तळेगाव- चाकण व चाकण शिक्रापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डी मुंबई त्याचप्रमाणे रांजणगाव औद्योगिक क्षेत्रास जोडणारा राष्ट्रीय महामार्ग असून तो चाकण तळेगाव चौकातून जातो. तसेच पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० हा देखील या चौकातून जातो. तसेच सदर चौकात हलकी, जड अवजड वाहनांची तसेच पादचाऱ्यांची देखील मोठी वर्दळ असल्याने या चौकात तसेच मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत असून किरकोळ तसेच प्राणांतिक अपघात होवून जिवीतहानी होत असते.

पुणे नाशिक महामार्गा वरील तळेगाव चौकातील वाहतुक कोंडी सोडविण्या करीता तसेच होणारे किरकोळ व गंभीर अपघातांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच सदर चौकातील वाहतुक हि सुरक्षित व सुरळीत होवून गतिमान होणेकरीता आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. त्या करीता कार्यालयीन जा.क्र पोउआ/वाहतूक/नियोजन/ १२२०५८२/२०२४ दिनांक ०३/०८/२०२४ अन्ययेच्या अधिसुचनेनुसार शिक्रापुर बाजूकडून चाकण मार्गे तळेगाव बाजुकडे जाण्यास च तळेगाव बाजुकडून चाकण मार्गे शिक्रापुरकडे येण्यास हलकी / लहान (L.M.V) वाहने वगळून सर्व जड/मध्यम वाहनांचे वाहतुकीस सकाळी ०८.०० ते ११.०० वाजे. दरम्यान व सायंकाळी १७.०० ते रात्रौ २०.०० वाजे. दरम्यान प्रवेश बंदी करण्यात येत आहे.तरी सदर मार्गावरून जाणाऱ्या जड/मध्यम वाहनांचे वाहनचालकांनी सकाळी ०८.०० ते ११.०० वाजे दरम्यान व सायंकाळी १७,०० ते रात्री २०.०० वाजेदरम्यान नमुद मार्गावर आपली वाहने घेवून येवू नये असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतुक शाखेमार्फत करण्यात आले आहे.

वाहतुक नियंत्रण अधिसुचना

:चाकण वाहतुक विभागाचे हद्दीत तळेगाव चाकण व चाकण शिक्रापुर हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डी मुंबई त्याचप्रमाणे रांजणगाव औद्योगिक क्षेत्रास जोडणारा राष्ट्रीय महामार्ग असुन तो चाकण तळेगाव चौकातून जातो तसेच पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० हा देखील सदर चौकातून जात आहे. सदर चौकात हलकी, जड अवजड वाहनांची तसेच पादचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावरील जड अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे चाकण तळेगाव चौकात वाहतुक कोंडी होत असल्याने तळेगाव चाकण शिक्रापुर रोडवरील जड अवजड वाहतुकीस ठराविक वेळे करीता येण्या जाण्यास प्रवेश बंदी करणे आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुक सुरक्षित व सुरळीतपणे होणे करीता, महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र. एम. व्ही. ए. ०१९६/८७१/सी आर ३७/टी आर ए २, दिनांक २७/०९/१९९६ चे नोटीफिकेशन नुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ (१) (ए) (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये तळेगाव, चाकण वाहतूक विभाग अंतर्गतशिक्रापुर बाजूकडून चाकण मार्गे तळेगाव बाजुकडे जाण्यास व तळेगाव बाजुकडून चाकण मार्गे शिक्रापुरकडे येण्यास हलकी / लहान (L.M.V) वाहने वगळून सर्व जड/मध्यम वाहनांचे वाहतुकीस सकाळी ०८-०० ते ११-०० वाजे दरम्यान व सांयकाळी १७-०० ते रात्री २०-०० वाजे दरम्यान प्रवेश बंदी करण्यात येत आहे.तरी वरील प्रमाणे सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांस प्रवेश बंदी करणेकरीता अधिसुचना निर्गमित करण्यात येत आहे.

सदर अधिसुचनेचीअंमलबजावणी दिनांक ०४/०८/०२०२४ रोजीपासून पुढील आदेशापर्यंत लागु करण्यात येत आहे.याबाबत विशाल गायकवाड, पोलीस उप-आयुक्त, वाहतुक शाखा, पिंपरी चिंचवड शहर, यापुर्वी काही निर्बंध असतील ते रद्द करण्यात येत असुन खालील प्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy