स्व. किरणशेठ वसंतराव मांजरे यांच्या स्मरणार्थ चक्रेश्वर मंदिर परिसरात वृक्षलागवड

Share This News

बातमी 24तास,वृत्त सेवा

दि.२२ जुलै २०२४ मा.जि.प.सदस्य स्व. किरणशेठ वसंतराव मांजरे यांच्या स्मरणार्थ चक्रेश्वर मंदिर परिसरात त्यांच्या कुटूंबीयांच्या वतीने विविध प्रकारच्या ५१ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी खेड तालुक्याचे माजी आमदार ॲड रामभाऊ कांडगे, उद्योजक बाळासाहेब मांजरे, ह.भ.प. मुक्ताजीदादा नाणेकर, प्रकाशशेठ मांजरे, उद्योजक सचिन मांजरे, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अतिश मांजरे, तुषार मांजरे, पराग मांजरे, कमलेश पठारे, पत्रकार कल्पेश भोई, अनिल देशमुख, अमोल जाधव,निवृत्त वनधिकारी बाळासाहेब गवते, अरुण देशमुख सर आदी उपस्थित होते.

दरम्यान गेल्या ७ जून रोजी किरणशेठ मांजरे यांचे निधन झाले होते. त्याच्या पर्यावरण प्रेमाचा वसा म्हणून त्यांच्या दशक्रियेला उपस्थितांना विविध झाडांचे बीज असलेले पर्यावरण पूरक पेन भेट देण्यात आले होते त्याचबरोबर श्री चक्रेश्वर मंदिर परिसर व स्व. आमदार वसंतराव मांजरे विद्यालय परिसरात वृक्ष लागवड देखील करण्यात आली होती. यावेळी निवृत्त वनअधिकारी बाळासाहेब गवते यांनी या वृक्षलागवडीचे संगोपनची जबाबदारी स्वीकारली. या प्रसंगी चक्रेश्वर देवस्थान, मांजरे परिवार व ग्रामस्थच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy