वाहतूक कोंडीमुक्त’ भोसरी मतदार संघासाठी सर्वसमावेशक ‘ॲक्शन प्लॅन’ भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

Share This News

वाहतूकसंबंधी सर्व विभागांची महत्त्वपूर्ण बैठक

बातमी 24तास (पिंपरी प्रतिनिधी) ‘‘वाहतूक कोंडी मुक्त’’ भोसरी विधानसभा मतदार संघासाठी महापालिका, पोलीस प्रशासन आणि संबंधित सर्व विभागांनी सर्वसमावेशन ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्यात येणार आहे. तसेच, खासगी बस यांचे थांबे निश्चित केले जाणार आहेत. वाहतूक सक्षम करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र समिती गठीत करण्यात आली आहे. यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. भोसरी विधानसभा मतदार संघातील वाहतूक समस्यांबाबत आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.

यावेळी महापालिका प्रभारी आयुक्त तथा ‘पीएमआरडीए’चे आयुक्त राहुल महिवाल, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, महापालिका मुख्य अभियंता मकरंद निकम, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त भास्कर डेरे, सर्व पोलीस निरीक्षक, पीएमपीएमएल अधिकारी, महावितरण अधिकारी, आरटीओ अधिकारी, स्थापत्य, उद्यान विभाग आणि क्षेत्रीय अधिकारी आदी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये अपघाताचे हॉट स्पाॅट आणि त्यावरील उपाययोजना याबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी नाशिक फाटा ते मोशीपर्यंत मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. काही झाडे जीर्ण झाल्यामुळे येत्या पावसाळ्यात काही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे, तर ती धोकादायक झाडांचे पुन:रोपण करावे. आवश्यक त्या ठिकाणी छटाई करण्याची सूचना वाहतूक पोलिसांनी केली. आवश्यकतेनुसार पी-वन आणि पी-टू याचे पार्किंग नियोजन करावे. अनेक ठिकाणी सिग्नलजवळ किंवा सिग्नल उभारण्यासाठी रस्त्याची खोदाई होते आणि डागडुजी न केल्यामुळे तिथे खड्डा निर्माण होतो. त्यामुळे वाहतुकीस अडथळा करणारे खड्डे तात्काळ बुजवावेत, अशी सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली.

धोकादायक डीपी हटवण्याची कारवाई :- देहू फाटा ते जगताप कार्यालयपर्यंत दोन इलेक्ट्रिक पोल आहेत ते काढून घेण्यात यावेत. ममता पार्क, दिघी येथील धोकादायक डीपी हटवावेत. आवश्यकतेनुसार पर्यायी रस्ते म्हणून दुसऱ्या रस्त्याकडे वाहतूक वळवणे. रिवर चौक चिखली येथील डिव्हायडर पूर्ण करणे. डायमंड चौक, कुदळवाडी येथील मोईला जाणारा रस्ता छोटा असल्यामुळे ट्राफिक समस्या नेहमीची असते तेथे कर्मचारी वाढवणे आणि रस्ता मोठा करणे. देहू-आळंदी रोडवर पाणीपुरवठा विभागाचे पाईप पडलेले आहेत. ते तात्काळ उचलून घेण्यात यावेत, अशा सविस्तर सूचनाही आमदार लांडगे यांनी केल्या आहेत.

वर्दळीच्या ठिकाणी अवजड वाहनांना बंदी…वाहतूक वर्दळीच्या ठिकाणी, शाळा, प्रशासकीय कार्यालयाच्या ठिकाणी अवजड वाहनांना नियमाप्रमाणे सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत बंदी असावी. तसेच, अवैधरित्या अवजड वाहने लोकवस्तीच्या ठिकाणी उभा केलेली असतात. त्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाहतूक सक्षम करण्यासाठी सर्व प्रशासकीय विभागांनी समन्वय करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. महानगरपालिकेने १५० वार्डन वाढवून देण्याची विनंती पोलीस प्रशासनाने केली आहे. त्यावर कार्यवाही करावी. भोसरी चौक, चऱ्होली चौक, चिखली चौक, तळवडे चौक, डुडूळगाव चौक, ममता चौक, दिघी येथील खड्डे त्वरित बुजूवण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया :

वाहतूक कोंडी मुक्त शहर करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत. समाविष्ट गावांसह दाट लोकवस्ती असलेल्या परिसरात वाहतुकीचे सुक्ष्म नियोजन करण्याबाबत प्रशासनाला सूचना केल्या आहेत. महापालिका, वाहतूक पोलीस, आरटीओ, पीएमपीएमएल, एमएसईबी अशा सर्वच विभागांनी मान्सूनच्या धर्तीवर सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यासाठी एकत्रितपणे वाहतूक सक्षमीकरणासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करणार आहोत. वाहतूक कोंडी मुक्त मतदारसंघ करण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे व आपल्या सूचना निश्चित कळवाव्यात. पुणे-नाशिक नाशिक रोड व कॅनबे चौक- चिखली, पुणे नाशिक रोडवर ट्रॅफिक वॉर्डनसह अतिरिक्त ट्रॅफिक पोलिस वाढवण्यात येणार आहेत.- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

प्रतिक्रिया :

शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणांसह पोलीस प्रशासन, वाहतूक शाखा यांनी समन्वय साधून कारवाई करावी. बसथांबे आणि रिक्षाथांबे निश्चित करून त्यांचे अनुपालन करण्यासाठी संबंधितांना सूचना कराव्या. शहरातील धोकादायक झालेली झाडे, पालखी मार्गातील अतिक्रमणे त्वरित काढण्यात यावेत. शहरातील पथारीवाले महापालिकेने त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या ठिकाणी गाड्या लावतील याची दक्षता घ्यावी. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुढील ९० दिवस अतिशय महत्वाचे असून प्रशासनाने त्याबाबत दक्ष राहावे. – राहुल महिवाल, आयुक्त पीएमआरडीए, पिंपरी-चिंचवड महापालिका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy