देशाचे स्थान उंचवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मताधिक्य द्या – अजित पवार

Share This News

बातमी 24तास चाकण,( संजय बोथरा )देशाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच जागतिक अर्थव्यवस्थेत देशाचे स्थान उंचावण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित दादा पवार यांनी केले. शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ चाकण येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी सुनील तटकरे, दिगंबर दुर्गाडे, आमदार दिलीप मोहिते, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे, रूपाली चाकणकर, राजेंद्र जवळेकर डॉ. राम गावडे, शांताराम भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. मतदार संघातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले. आढळराव यांच्या उद्योग व्यवसायाची देश विदेशातील प्रगती पाहून विरोधकांनी त्यांच्या बदनामीचा कट रचला आहे असा आरोप पवार यांनी केला आपल्या भाषणात केला.

ग्रामीण भागातील मुलांनी शिकावे, परदेशी शिक्षण घ्यावे यासाठी पालक प्रयत्न करतात. त्यांना अर्थ सहाय्य व्हावे यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून 40 लाख रुपयांचे कर्ज नाममात्र व्याजदराने परदेशी शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले जाते.अशी माहितीही त्यांनी दिली. पुणे नाशिक रेल्वेचे रखडलेले काम करताना मोबदल्या अभावी शेतकरी नाराज होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेऊन केले जाईल. असे अभिवचन अजित पवार यांनी दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश वाडेकर यांनी केले तर आभार राम गोरे यांनी मानले.

चौकट

सभा सुरु होण्यापूर्वी जोमदार पण अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सभा रद्द होईल अशी शंका निर्माण झाली. मात्र काही वेळातच पाऊस येणे थांबले. अन सभा संपल्यानंतर पुन्हा पाऊस सुरु झाला. तेव्हा सभेसाठी पाऊस थांबला अशी चर्चा उपस्थित नागरिकांत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy