पोलिस हवालदार दीपक साबळे यांना पोलिस महासंचालक पदक

Share This News

बातमी 24तास, ऑनलाईन न्यूज पोर्टल

(जुन्नर /आनंद कांबळे) महाराष्ट्र पोलीस दलातर्फे दिले जाणारे पोलीस महासंचालक पदक या वर्षी स्थानिक गुन्हे शाखे मध्ये काम करण्याऱ्या पो.हवा. दिपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले यांना देण्यात आले.

सदर टीमने गुन्हे शाखे मध्ये काम करत असताना अनेक पिंपरखेड महाराष्ट्र बँक दरोडा असे मोठे दरोडे, अनेक खून, अनेक जबरी चोऱ्या यांसारख्या अनेक गुन्ह्याची उकल करून आरोपींना अटक केली आहे. प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला खुनातील संशयित आरोपी संतोष जाधव याला गुजरात येथून महाराष्ट्रातून महाकाळ उर्फ सिद्धेश कांबळे याला अटक करून त्याची संपूर्ण टोळी पकडून त्यांच्याकडून एकूण १५ पिस्टल जमा केल्या होत्या. याच कार्याची दखल घेत महाराष्ट्र पोलीस दला तर्फे सदर टीम ला पोलीस महासंचालक पदक देऊन गौरव करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy