मेफेड्रोन’ प्रकरणात सापडलेला पोलीस उपनिरीक्षक निलंबित; पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तांची कारवाई

Share This News

बातमी 24तास, ऑनलाईन न्यूज पोर्टल

( पिंपरी प्रतिनिधी )

पिंपळेनिलख रक्षक चौकात केलेल्या कारवाई मध्ये  ४४ किलो ७९० ग्रॅम किलो वजनाचे ४४ कोटी ७९ लाख ८० हजार रुपयांचे मेफेड्रोन अमली पदार्थासह मिळून आल्यानंतर,पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तांची कारवाईत ‘मेफेड्रोन’ प्रकरणात सापडलेला पोलीस उपनिरीक्षकास निलंबित; करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आहेत.पिंपळेनिलख रक्षक चौकामध्ये हॉटेल कामगाराकडून दोन कोटी रूपये किंमतीचे मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ जप्त केल्यानंतर या प्रकरणात निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याला अटक करण्यात आली आहे.

न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन कोठून आणले याची विचारणा पोलिसांनी केल्यावर नमामीने निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक शेळके याचे नाव घेतले. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. शेळके याचा सहभाग आढळल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy