एस टी महामंडळाच्या लाल परीची मागील दोन चाक निखळली , चालकाच्या प्रसंगावधनामुळे मोठा अपघात टळला

Share This News

बातमी 24तास Web News Portal

(विशेष प्रतिनिधी)

पुणे – नाशिक महामार्गावरील आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडी भिलवस्ती जवळ परळ डेपोची बस क्रमांक एमएच १२ बीएल ३६१८ ही बस परळवरुन नारायणगावकडे निघाली होती. आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडी हद्दीत मोरडे चॉकलेट कारखान्याजवळ एस टी बसला एक धडकी भरवणारी घटना घडली आहे.

महामार्गावर धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या लाल परी बसची मागची दोन्ही चाकं निखळल्याची घटना झाल्याने मोठी खळबळ उडाली. सदर एस टी बस ची मागील दोन्ही चाकं निखळ्यानंतर एक चाक बसच्या पुढे आणि दुसरं चाकं रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या चरित जाऊन पडले. ही बस जवळपास १५ ते २० सेकंद चार चाकांवर धावत असल्याची माहिती समोर आली आहे.

या बसमध्ये एकूण ३५ प्रवाशी होते. मात्र, चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून बसमधील ३५ प्रवासी सुखरुप बचावले आहेत. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुणे – नाशिक महामार्गावर असणाऱ्या शेवाळवाडी परिसरात एस टी च्या लालपरीची मागची दोन्ही चाके अचानक निखळली. त्यावेळी ही एसटी बस रस्त्यावर धावत होती. जवळपास १५ ते २० सेकंद ही बस रस्त्यावर धावत होती. त्यातील एक चाक बसच्या पुढे तर एक चाक रस्त्याच्या बाजूला खोल चरित जाऊन पडले. बस तिरकी होऊन रस्त्यावरच धावत होती. या बसमध्ये असणाऱ्या प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आणि भीतीचे वातावरण पसरून बसमध्ये आरडाओरड सुरू झाला . परळ डेपोची बस क्रमांक एमएच १२ बीएल ३६१८ ही बस परळवरुन नारायणगावकडे निघाली होती. आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडी हद्दीत मोरडे चॉकलेट कारखान्याजवळएस टी बस आली असता ही घटना घडली आहे. एसटी बसचे चाकं निखळल्यामुळे बसमधील प्रवाशांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागला. बसची दोन्ही चाकं निघून गेल्यावर बस पुढील दोन चाकांवर घासत पुढे जात असल्याचे पाहायला मिळत आहे. बस चा मागील भाग घासत गेल्यामुळे रस्त्यावर अक्षरशः ठिणग्या उडत होत्या. मात्र, हा प्रकार चालकाच्या वेळीच लक्षात आल्यावर त्याने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. या प्रसंगाने एसटी बसची चाकं अचानक पणे निघून जाई पर्यंत चालक आणि वाहक काय करत होते? त्यांना बस तपासून घेता आली नाही का? असा संतप्त सवाल प्रवासी नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy