गाथा परिवार कीर्तन व प्रवचन प्रशिक्षण शिबिराचे आळंदीत उदघाटन

Share This News

बातमी 24तास Web News Portal

(प्रतिनिधि आरीफ शेख)आळंदी देवाची येथील आनंद आश्रम येथे प्रवचन किर्तन प्रशिक्षण शिबिरचा शुभारंभ झाला. या शिबिराची संकल्पना उल्हास पाटील व डॉ चद्रकांत कोलते,यांची आहे या बाबत माहिती देताना डॉ कोलते म्हणतात की समाजात जातीवाद फोफावत आहे.मानवी मूल्य जपली जावी. तसेच जातीभेद अमंगल हे संतांनी सांगितलं आहे. तरी हि जातीपाती चे सुलतानी संकट देशात फोफावले जाणे साठी पोषक वातावरण तयार केलें जात आहे. त्याला प्रतिबंध करणे साठी कीर्तनकार प्रवचनकार समाजात तयार करण्याचे दुसरे पर्व आळंदीत सुरू केलें आहे.तसेच.सुमारें तीन महिने हे पर्व सुरू राहणार आहे.तसेच देहू मधील पाहिले पर्व सुमारें तीन महिने चालले होते. यात सुमारें 18 प्रवचनकार कीर्तनकार तयार झालेच उल्हास पाटील सांगतात.आळंदीच्या चाकण रोड हनुमान वाडी येथिल आनंद आश्रम येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याचा लाभ पंचक्रोशी नागरीक घेतं आहेत.देशात अजारकता माजवली जात आहे, हिंदु धर्म नावाचा वापर करत .जातीजातीत भांडणे लावली जात आहेत , हे योग्य नाही यासाठी कीर्तन प्रवचन च्या माध्यमातुन समाजात जातीय सलोखा जपत प्रबोधनकार प्रवचनकार कीर्तनकार यांनी पुढाकार घ्यावा त्या साठी गाथा परिवार प्रयत्न करत राहणार आहे असे डॉ चंद्रकांत कोलते यांनी सांगितले आहे.त्याचबरोबरच छत्रपती संभाजी महाराज जयंती निमीत्त त्यांच्या प्रतिमेे स अभिवादन करणेत आले आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश मान्यवर वक्त्यांनी व हरिभक्त परायण प्रवचनकार कीर्तनकारांनी टाकला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy