साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयात “संविधान गौरवदिन” साजरा.

Share This News

बातमी 24तास, ऑनलाईन न्यूज पोर्टल राजगुरुनगर (ता: खेड) येथील खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयामध्ये “संविधान गौरवदिन” साजरा करण्यात आला. संविधान गौरव दिनानिमित्त महाविद्यालयांमध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये संविधान जागरूकता व्हावी या उद्देशाने ऑनलाईन प्रश्नउत्तर(Quiz)घेण्यात आली. तसेच निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.तसेच मुंबईमध्ये २६/११/२००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवान व नागरिकांना आदरांजली वाहण्यात आली.खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टेपाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, मानद सचिव हरिभाऊ सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान गौरवदिनाचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात संविधान गौरवदिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निबंध स्पर्धा घेण्यात आली. त्यात महाविद्यालयातील 85 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. तसेच ऑनलाइन प्रश्नउत्तर(Quiz)घेण्यात आली.यावेळी साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, कला विभाग प्रमुख प्रा. साईनाथ पाचारणे, प्रा.एम.पी.कोल्हे,प्रा. ए.ए.इंदायिस, प्रा. एस. एल. बुरुड, प्रा. जी. जी. आहेरकर, प्रा. एस. एस. देशमुख प्रा. पी.एन. गदादे, प्रा. ए. एच. इनामदार, प्रा. एल. बी. काठे, प्रा. एस. एस. खराडे, ,प्रा. ए. जे. शेख, प्रा.सोनाली नाईकरे,प्रा. पी. पी. चौधरी, प्रा.आर. आर. जाधव, प्रा. के.डी. मांडगे आदी प्राध्यापक उपस्थित होते.प्राचार्य डॉ. एच. एम. जरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जी. जी. आहेरकर यांनी केले व संविधान उद्देशिका वाचन प्रा. एस. एस. देशमुख यांनी केले तर आभार प्रा. एस. एल. बुरुड यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy