आरक्षणाची मशाल पेटली आळंदीत पहाटे तीन वाजता मनोज जरांगे पाटलांची तोफ धडाडली

Share This News

बातमी 24तास, ऑनलाईन न्यूज पोर्टल

(प्रतिनिधी :आरिफ भाई शेख) आळंदी: सकल मराठा समाजासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या मनोज जरांगे पाटलांची डोळ्यात तेल घालून पहाटे पर्यंत वाट पाहत उभा राहिलेला सकल मराठा समाज, दिवसाची रात्र रात्रीची पहाट झाली तरीही मनामध्ये तो जोश आणि स्वागतासाठी अतुर झालेले जोडलेले हात. हे सर्व दृश्य आहे. तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथील मनोज रंगे पाटील यांचा महाराष्ट्रभर दौरा चालू आहे मराठा आरक्षणासाठी रान उठले आहे.आणि यातच आळंदी तीर्थक्षेत्री त्यांचे आगमन होणार होते. त्यासाठी नियोजन ठरलं साडेनऊ वाजता म्हणून जरांगे पाटील येणार म्हणून मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी झाली परंतु कार्यक्रमाचा रस्त्यातील ओघ काही पूर्ण होईना आणि शेवटी कसे बसे रात्री अडीच वाजता जरांगे पाटील यांचे आळंदीतील चाकण चौक येथे आगमन झाले. मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करत क्रेनने फुलांचा मोठा हार त्यांच्या गळ्यात मराठा सकल समाजाच्या वतीने घालण्यात आला. एक मराठा लाख मराठा आणि आळंदी दुमदुमली आणि मिरवणुकीने चाकण चौक भैरवनाथ चौक लक्ष्मी माता मंदिर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज मार्ग जवळ रात्रीचे तीन ते सव्वातीनशे दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची तोफ धडाडली. आळंदीतील भल्या पहाटेच्या या उत्साह पूर्ण स्वागत आणि मनोज जरांगे पाटील भारावून गेले. मराठा आरक्षणाची लढाईतील आळंदीतील हा ऐतिहासिक क्षण म्हणावा लागेल. कारण भले पहाटेची ही सभा तेवढीच अलोट गर्दी तितका जल्लोष तितका जोश आज पर्यंतच्या सर्व सभांचे रेकॉर्ड तोडणारा ठरला. सकल मराठा समाजाला संबोधताना जरांगे पाटील कुठलेही प्रकारचा उद्रेक करू नका एकजूट ठेवा आरक्षण शंभर टक्के मिळणार आहे याबाबत मला आता खात्री झाली कारण माऊलींच्या आळंदीमध्ये एवढ्या मोठ्या स्वरूपात महाराज मंडळींनी केलेला जल्लोष आणि स्वागत हे माझ्यासाठी ऐतिहासिक आहे. शंभर टक्के मिळणार आहे त्यामुळे कोणीही आत्महत्या करायची नाही जाळपोळ करायची नाही असे मनोगत जरांगे पाटील यांनी व्यक्त केले त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने आमच्या माता भगिनीवर शांततेत आंदोलन करत असताना त्यांची डोकी फोडली त्यांना मारहाण केली याचा उल्लेख जरांगे पाटील यांनी केला तसेच जातीय दंगली घडून आणण्याचा कट आहे मराठ्यांचा अपमान करायचा आणि ओबीसी मराठा जातीय दंगल घडवायची असा प्रकार असल्याने सर्वांनी शांततेत कुठलीही प्रतिक्रिया न देता शांत राहण्याची आव्हान त्यांनी केली सरकार दिवस-रात्र 24 तास नोंदी शोधण्याचं काम करत आहे नोंदणी निघाले आहेत माझे आरक्षण पक्के आहे आपल्याला यश मिळते याबाबतही त्यांनी वक्तव्य केलं एवढ्या मोठ्या प्रमाणात भल्या पहाटे तीन वाजता सकल मराठा समाजा आळंदी येथे एवढ्या मोठ्या प्रमाणात हजर असतील यावर माझा विश्वास बसला नाही परंतु वस्तुस्थिती खरे निघाली आणि माझ्या आयुष्यातील सर्वात ऐतिहासिक क्षण हा आळंदी भेटीचा आहे येथील गर्दीचा आहे महाराज मंडळींनी सदैव आशीर्वाद देत पाठीशी उभे राहिले हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे तसेच वारकरी संप्रदाय कधी राजकारण या फंदात पडत नाही मात्र आज एक समाज बांधव म्हणून महाराज मंडळींनी हरिनामाच्या गजरामध्ये केलेले स्वागत आणि मोठ्या प्रमाणात महाराज मंडळींची असलेली उपस्थिती यामुळे मनोज जरांगे पाटील मात्र भारावून गेलेले दिसले पहाटे सव्वा तीन चार सुमारात एक मराठा लाख मराठा अशा घोषणाने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दम दमून गेले आळंदीत या घोषणा गुन गुनू लागल्या आणि मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाची वजन मोठ आवडत दिनांक चोवीस डिसेंबरला सुवर्णक्षण येणार आहे आणि गोरगरिबांच्या मराठा लेकरांना नोकरी शिक्षणाचा घास मिळणार आहे याबाबत समाधान व्यक्त केले समाज का नको परत माझ्या पाठीशी उभा राहिला नोकरदार वर्ग तळागाळातील सामान्य मराठा समाज सर्वांनी उचलून धरले त्यामुळे जीवात जीव असेपर्यंत जीव गेला तरी चालेल पण आरक्षण मात्र घेणारच हा पण मनोज सारंग पाटील यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवला संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरामध्ये जरांगे पाटील यांनी दर्शन घेतल्यानंतर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने जरांगे पाटील यांचे एडवोकेट विकास ढगे यांनी संस्थान कमिटीचे वतीने त्यांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy