उद्योजकाचे अपहरण करून जिवे ठार मारण्याचा धाक दाखवत खंडणी मागणा-या सराईतांना चाकण पोलिसांनी केली अटक

Share This News

बातमी 24तास ऑनलाईन न्यूज पोर्टल

(वृत्त सेवा) वर्कशॉप मधील काम आटोपून घरी जात असताना पाच ते सहा अनोळखी इसमांनी मोटर सायकलला रिक्षा आडवी लावून तू आमच्या रिक्षास धडक मारली असे म्हणून जबरदस्तीने रिक्षात बसवून निर्जन ठिकाणी नेऊन तुझा खूप मोठा व्यवसाय आहे आम्हाला माहित आहे आम्हाला एक कोटी रुपये दे तरच तुला सोडू नाहीतर घरच्यांना व तुला मारून टाकू अशी धमकी देणाऱ्या आरोपींना चाकण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,दिनांक २१/०९/२०२३ रोजी रात्री ०९/१५ चे सुमारास फिर्यादी संजय धुलाप्पा कुरूंदवाडे वय ५५ वर्षे, धंदा. उदयोजक रा. एकता नगर चाकण ता. खेड जि. पुणे हे आळंदी फाटा येथील त्यांचे वर्कशॉप मधुन एकता नगर चाकण येथील त्यांचे घराकडे जात असतांना सहा अनोळखी इसमांनी मिळून त्यांच्या मोटार सायकलला रिक्षा आडवी लावून आडवली व तु आमचे रिक्षास धड़क मारली असा बहाणा करत सदर इसमांनी कुरूंदवाडे यांना त्यांचे रिक्षात जबरदस्तीने बसवुन गॅरेजला जाऊ तेथे सर्व खर्च दे असे म्हणत लादवड परीसरातील पाईट शिरोली रस्त्याशेजारी निर्जन ठिकाणी नेवुन फिर्यादी कुरूंदवाडे यांना तुझा व्यवसाय खुप मोठा आहे. तु आम्हाला एक कोटी रूपये दयावे लागतील तरच तुला सोडु नाहीतर तुला व तुझे घरच्यांचा गेम करून टाकीन अशी धमकी देत हत्यार दाखवले, त्यावेळी फिर्यादी संयज कुरूंदवाडे यांनी त्यांना दोन दिवसांमध्ये १२ लाख रुपये देण्याचे मान्य केले. त्यावेळी सदर अनोळखी चोरटयांनी फिर्यादीचे सॅक मधील २० हजार रुपये जबरीने काढून घेतले व दोन दिवसांमध्ये बाकीचे पैसे दिले नाहीत अगर पोलीसांना त्याबाबत काही सांगीतले तर तुला व तुझे घरातील लोकांना सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यावेळी सदर अनोळखी लोकांनी संजय धुलाप्पा कुरूंदवाडे यांना सोडले. त्यानंतर दिनांक २२/०९/२०२३ रोजी सायंकाळी ०५/०० वा. चे सुमारास सदर अनोळखी लोकांनी फिर्यादी यांना फोन करून शनिवारी ०५ लाख रूपये दे व रविवारी ०७ लाख रूपये दे असे म्हणुन पैशाचे नियोजन झाले का नाही या बाबत फोन करून विचारले असता फिर्यादी यांनी घाबरून त्यांना पैशाची व्यवस्था करीत असल्याचे सांगितले दिनांक २३/०९/२०२३ रोजी सायंकाळी ०५/०० वाजता चे दरम्यान सदर अनोळखी इसमांनी वेगवेगळ्या फोनवरून संजय धुलाप्पा कुरूंदवाडे यांना फोन करून धमक्या देत खंडणीचे पैशाची मागणी केली असता संजय धुलाप्पा कुरूंदवाडे यांनी त्यांचे मित्र व नातेवाईक यांना सदर प्रकार सांगितला असता मित्रांनी संजय कुरूंदवाडे यांना धीर दिला. त्यानंतर संजय कुरूंदवाडे हे मित्रांसोबत चाकण पोलीस स्टेशन येथे तकार देण्यासाठी आले त्यादरम्यान सदर अनोळखी इसम संजय कुरूंदवाडे यांचे फोनवर वेगवेगळया फोन वरून फोन करून खंडणीसाठी तगादा लावुन नाणेकरवाडी येथील आरोग्यम हॉस्पीटल जवळील जंबुकर वस्तीकडे जाणारे रोडने बोलावले होते. त्यावेळी चाकण पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी संजय कुरुंदवाडे यांचे सोबत नाणेकरवाडी येथे जावून अनोळखी इसमांनी पैसे घेऊन बोलावलेल्या ठिकाणी सापळा लावला. त्यावेळी सदर अनोळखी आरोपींनी संजय कुरुंदवाडे यांना नाणेकरवाडी येथील आरोग्यम हॉस्पीटल जवळ असलेल्या हिताची एटीएमचे बाजुचे कच-याचे डब्यात पैसे टाकुन निघून जाण्यासाठी सांगितले त्याप्रमाणे संजय कुरूंदवाडे यांनी त्यांचेकडील सॅक एटीएमचे बाजुचे कच-याचे डब्यात टाकली व तेथुन निघुन गेले असता एक इसम पैसे घेण्यासाठी आला त्यावेळी सापळा लावलेल्या गुन्हे शोध पथकाने त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यावेळी ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव आकाश विनायक भुरे, वय २४ वर्षे रा. नाणेकरवाडी ताखेड जि पुणे असे सांगितले, त्यास त्याचे सहकारी यांचे बद्दल विचारले असता त्याने त्याचे सहकारी शुभम युवराज सरवदे, अजय येलोटे, सोहेल पठाण, पन्या गोसावी असे असल्याचे सांगितले. त्यानंतर संजय कुरूंदवाडे यांचे तक्रारीवरून चाकण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं ७५५ / २०२३ भादवि कलम ३९५, ३८७, ३६४ अ प्रमाणे दाखल केला.

सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ३ संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त, राजेंद्र गौर यांनी तात्काळ घटनास्थळावर येवून घटने बाबत माहिती घेतली व तपास पथकाला गुन्हयाचे तपासात सुचना, मार्गदर्शन केले. त्यांनर सदर गुन्हयाचे तपासात सदरचा गुन्हा हा १) शुभम उर्फ सोन्या विनोद काकडे रा. अहमदनगर कॉलनी,नाणेकरवाडी ता खेड जि पुणे याने आरोपी नामे २) आकाश विनायक भुरे, वय २४ रा. नाणेकरवाडी ता. खेड जि पुणे, ३) शुभम युवराज सरवदे, वय २१ वर्षे, रा. नाणेकरवाडी ता खेड जि पुणे, ४) अजय नंदु होले. वय २८ वर्षे, रा. हडपसर गाडीतळ पुणे, ५) नवनाथ शांताराम बच्छे, वय २७ वर्षे, शिकापुर रोड, कडाचीवाडी ता खेड जि. पुणे व आणखी दोन आरोपी यांचेशी संगनमत करून नियोजनबध्द कट रचून हा गुन्हा केलेला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदर गुन्हा केल्यानंतर वरील आरोपी हे फरार झाले होते, त्यानंतर चाकण पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सलग तीन दिवस अथक परीश्रम घेऊन च-होली, शिकापुर, हडपसर, कात्रज, पुणे येथून आरोपींचा शोध घेत ताब्यात घेतले असुन सदर गुन्हयात एकुण ०५ आरोपींना अटक करण्यात आलेली असून उर्वरीत ०२ आरोपींचा शोध चालु आहे. यातील अटक आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर यापूर्वी चोरी खुन, मारामारी, चोरी, अवैध शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.अशा प्रकारचे खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.अ.क्र १)आरोपीचे नाव आकाश विनायक भुरे2)शुभम युवराज सरोदे3)अजय नंदू होले4)नवनाथ शांताराम बच्चे5)शुभम उफ सोन्या विनोद काकडेपूर्व इतिहास / दाखल गुन्हे १) चाकण पो. स्टे. २७३/२०२२ महा. दारूबंदी कायदा कलम ६५ (ई)१) चाकण पो. स्टे. ५७० / २०२५ भादवि कलम ४५२,४२७,३२४, ५०४, ५०६,३४२) राजगड पो स्टे ७१ /२०२३ भादवि कलम ३८०, ५११, ४२७.१) हडपसर पो स्टे 1७७/२०१८ भादवि कलम ३५४ ड पोस्को कलम ८, १२ २ ) हडपसर पो. स्टे. १५० / २०२१ आर्म अॅक्ट कलम ३ (२५).१) चाकण पो. स्टे. १२८१/२०१७ भादवि कलम ३०२, ३९७ ४०४३४१) भोसरी पो स्टे ३२६ / २०२० आर्म अॅक्ट कलम ३ (२५) २) चाकण पो. स्टे, २४ / २०२० आर्म अॅक्ट कलम ३५ (२५)सदर गुन्हयातील अटक आरोपी क ०१ ते ०५ यांची दिनांक ०१/१०/२०२३ पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त, विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त, संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ३ संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त, राजेंद्र गौर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, पोलीस निरीक्षक गुन्हे युनुस मुलाणी तसेच तपास पथकाचे सपोनि प्रसन्न ज-हाड, सपोनि विक्रम गायकवाड, सफौ / सुरेश हिंगे, पोहवा / राजु जाधव, पो हवा /संदिप सोनवणे, पो हवा / हनुमंत कांबळे, पो हवा भैरोबा यादव, पोना / निखील शेटे, पोकों / नितीन गुंजाळ, पोकों / निखील वर्पे , पोका / प्रदिप राळे, पोकों / सुनिल भागवत, पोका / ईश्वर गंगावणे, पोकों / अशोक दिवटे, पोका / महेश कोळी,पोकों / विवेक सानप, मपोकों / माधुरी कचाटे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि विक्रम गायकवाड हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy