“स्वच्छता हि सेवा” या कार्यक्रमातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन

Share This News

बातमी 24तास ऑनलाईन न्यूज पोर्टल

(वृत्त सेवा) चला करूया स्वच्छतेसाठी श्रमदान स्वच्छता पंधरवडा अभियान अंतर्गत “स्वच्छता हि सेवा” या कार्यक्रमातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त महात्मा गांधी यांना अभिवादन म्हणून संपूर्ण भारतात दि. ०१ / १० / २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता “स्वच्छता हि सेवा ” हा कार्यक्रम राबविण्यात आला.चाकण नगरपरिषद चाकण मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छता हि सेवा’ अभियान अंतर्गत चाकण शहरातील सहा ठिकाणी ( जिल्हा परिषद शाळा क्रमांक १, चक्रेश्वर मंदिर परिसर, संग्राम दुर्ग किल्ला, बाजार समिती, ग्रामीण रुग्णालयात चाकण, व धाडगे मळा) दि. ०१/१०/२०२३ रोजी सकाळी १०:०० ते ११:०० दरम्यान शाळेतील विद्यार्थी तसेच शहरातील उपस्थित नागरिक नगर परिषदेचे कर्मचारी एनडीके कर्मचारी तसेच कारपे प्रतिनिधी या सर्वांनी श्रमदान करून परिसर साफसफाई करुन स्वच्छतेबद्दल शपथ घेतली.यावेळेस शहरातील नागरिक सर्व नगर परिषद अधिकारी, पदाधिकारीवर्ग, नगरपरिषद कर्मचारी, एनडीके कर्मचारी शाळेतील शिक्षक व विदयार्थी,कारपे प्रतिनिधी असे एकूण १२०० ते १४०० जण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy