शेलू (ता. खेड) येथील प्राथमिक शाळेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी उद्योजक पोपटराव पडदुणे यांची तर उपाध्यक्षपदी संजीव करंडे यांची निवड

Share This News

बातमी 24तास, ऑनलाईन न्यूज पोर्टल

(आसखेड) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलु येथील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी उद्योजक पोपटराव पडदुणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदी आदर्श शिक्षक संजीव करंडे यांची निवड करण्यात आली यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष पोपटराव पडदुणे म्हणाले की, शालेय गुणवत्ता वाढीसाठी आणि शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी व शाळेच्या इतरही समस्यांसाठी प्राधान्य देणार आहे . भौतिक सुविधांसह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील व त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. निवडीवेळी मुख्याध्यापक तानाजी खैरे , स्कूल कमिटीचे माजी अध्यक्ष काळूराम करंडे सरपंच अक्षय पडवळ ,उपसरपंच अक्षय गाडे ,आनंदराव सांडभोर , माजी चेअरमन ज्ञानेश्वर पडवळ, समाजभूषण कैलास पडवळ, उद्योजक दत्ता चोरघे ,पिंटूभाऊ पडदूणे, निलेश घावटे, मिलिंद दिवे, विक्रम पडवळ ,पालक ,ग्रामस्थ व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते . निवडीबद्दल परिसरातील आसखेड, शिंदे, वासुली, आंबेठाण ,कोरेगाव वराळे येथील नागरिक व मित्रपरिवराने अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy