(प्रतिनिधी, सम्राट राऊत ) 76 व्या स्वातंत्र्य दिनाचे 15 ऑगस्ट औचित्य साधून चिंतामणी प्रतिष्ठाण ट्रस्ट व चाकण ब्लड बँक आयोजित भव्य रक्तदान शिबिरास चाकणकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी या रक्तदान शिबीरात एकूण 112 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांचे प्रमाणपत्र व एक लाखाचा अपघाती विमा मोफत देऊन सन्मान करण्यात आला.शिबिरास चिंतामणी प्रतिष्ठाणच्या सर्व कार्यकर्त्यांनी गणपतीची आरती करून उदघाट्न केले.तसेच भादवड , ता.धुळे येथे ही सरपंच स्वप्निल युवराज पाटील यांच्या सहकार्यातून तेथील अदिवासी शाळकरी मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.व तेथे रक्तदान शिबिर ही घेण्यात आले. एकूण 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांचे प्रमाणपत्र व एक झाड देऊन सन्मान करण्यात आला.
स्वप्ननगरी मधील शिबिरास चाकणचे माजी नगराध्यक्ष शेखर घोगरे , नाणेकरवाडी चे उपसरपंच महेश जाधव ,उद्योजक ब्रिजेश जाधव , उपसरपंच नितीन नाणेकर , उद्योजक शरद नाणेकर , सुर्यकांत जाधव , बाळासाहेब नाणेकर , चंद्रकांतदादा जाधव , बाळासाहेब जाधव, युवा नेते नितीन दादा वाव्हळ यांनीही भेट देऊन प्रतिष्ठानचे अभिनंदन केले.हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आकाश जाधव,भावेश गवांदे, अश्विन पिंगळे, विशालभाऊ गोरे, गणेश शेठ भंडारे, श्रीकांत गोरे, प्रशांत पाटील, युवराज खराडे , ऋषिकेश गोरे, शुभम गोरे, रोहित जाधव, योगेश शिंदे, मोहन कोकाटे, बसवराज पाटील, गणेश आरोटे , मंगेश घोंगे, श्रेयश कापरे, सुरज गोरे , आकाश आहेर , धनंजय देशमुख, वेदांत गोरे, श्रवण गोरे, हरीश गोरे , धीरज भंडारे या सर्वांनी योगदान दिले. तसेच प्रत्येक रक्तदात्याला चिंतामणी प्रतिष्ठान ट्रस्ट तर्फे मोफत प्रत्येकी एक लक्ष रुपयांचा अपघाती विमा देण्यात आला. त्यासाठी द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे विमा सल्लागार निलेश गुलाबराव पठारे आणि वैभव शिवाजी कोहिनकर यांचे सहकार्य लाभले.