बातमी24तास, Web News Portal (प्रतिनिधी, कमलेश पठारे) १५ अॅागस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त जि.प.प्राथमिक शाळा,पठारवाडी येथे वाडीतील ग्रामस्थ,महिला,युवक यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन मोठया उत्सवात ध्वजरोहनचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी ध्वजारोहण कैलास रामचंद्र पठारे,सुनिल साहेबराव पठारे,दत्तात्रय मच्छिंद्र पठारे,तुषार हनुमंत पठारे व गणेश ज़ालिंदर सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले.कार्यक्रमाचे अध्यक्ष नवनाथ बबन पठारे होते व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सोनाली शिंदे उपाध्यक्षा सुवर्णा पठारे सामाजिक कार्यकर्ते सुलाभराव बाबुराव पठारे,गणपत देवराम पठारे,पांडुरंग बाबुराव पठारे,रामचंद्र बाबुराव पठारे,योगेश सुभाष पठारे,बाळासाहेब मंडलिक,दिनेश सोनवणे,अमोल पठारे,सुजित पठारे,रूपेश पठारे,स्वप्निल येळवंडे,विजय पठारे,संपत पठारे,पार्वतीबाई पठारे,ज्योतीताई पठारे,वैशालीताई पठारे शाळेतील शिक्षिका अर्चना पाटील व अंगणवाडी शिक्षिका ललिता पठारे व इतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी किरण रामचंद्र पठारे,कैलास रामचंद्र पठारे व ज्योतीताई कैलास पठारे यांच्या तर्फे शाळेसाठी हुतात्मा सुखदेव,भगतसिंग,राजगुरु यांची प्रतिमा भेट देण्यात आली.व लहान मुलांना खाऊ वाटप करुन शाळेतील शिक्षक मनोहर मोहरे यांनी आभार मानून कार्यक्रमची सांगता झाली.