(वृत्त सेवा) 15 ऑगस्ट 2023 रोजी हनुमान मंदिर नेहरू चौक येथे चाकण आणी परिसरातील वाड्या,वस्त्या गावा मधील सजग नागरिकांनी एकत्र येऊन चाकण नागरिक संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली.चाकण मधील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत सोपाना गोरे पाटील, राजेंद्र सासवडे,राजेंद्र जगनाडे,मच्छिंद्र शेवकरी गुरुजी,संजय वाडेकर सर नितीन सोरटे,अस्लम भाई सिकिलकर,जेष्ठ नागरिक ए.पी.शेख,डॉ.आवटे,सामाजिक कार्यकर्ते अरुण थोपटे,गुलाब लेंडघर,विशाल बारवकर,नामदेव पडदूणे, या सह सुमारे 25 जण उपस्थित होते.आंतरराष्ट्रीय पातळीवर औद्योगिक नगरी म्हणून ओळखलं जाणारे चाकण शहर आणि परिसरात दिवसेंदिवस वाहतूक समस्या वाढली आहे. त्याच सोबत चाकणचा पाणी प्रश्न बिकट झाला आहे.
त्याच प्रमाणे अनेक नागरिक समस्यांवर शासकीय स्तरावर आवाज उठवून चाकण आणी परिसरातील वाड्या गावांसाठी नागरिकांनी एकत्र येऊन बैठकीत आपली मते मांडली.तसेच नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन आपल्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.बैठकीत डॉ.आवटे, मच्छिंद्र शेवकरी गुरुजी यांनी समस्यांचा पाढा वाचून दाखवला.स्वागत चंद्रकांत गोरे पाटिल यांनी केले आणि आभार राजेंद्र सासवडे यांनी केले.