(प्रतिनिधी,आरिफ भाई शेख) आळंदी देवाची येथील बिबट्याची दहशत वाढली आहे दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काल बबन दामू कोरडे यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्यानंतर आज मात्र बिबट्या हा बिनधास्तपणे वावरताना अनिल कुऱ्हाडे यांच्या शेतामध्ये, सतीश बबनराव कुऱ्हाडे यांच्या घराच्या मागील बाजूस सावजाचा शोध घेताना दिसून आला. आळंदी वनपरिक्षेत्राच्या गायकवाड मॅडम यांनी पिंजरा लावण्याची व्यवस्था केली असल्याचे समजते परंतु सुरुवातीला काल रात्रीच्या वेळेस दबा धरून लपछपती येणारा बिबट्या आज मात्र दिवसाढवळ्या समोर दिसल्याने नागरिकांची घाबरगुंडी उडाली आहे,सदर चित्रीकरण सतिश बबनराव कुऱ्हाडे यांनी काढून मदतीची गरज असल्याचे सांगीतले आहे.
बिबट्या हा मनुष्य गण वस्ती असलेल्या ठिकाणी दिसून आल्याने मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण आहे. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात माणसे समोर दिसताना सुद्धा हा बिबट्या कोणालाही न भिता बिंदासपणे वावरताना दिसून आला आहे. शासनाने वेळेत काळजी न घेतल्यास या बिबट्याचे नर भक्षक बिबट्यामध्ये रूपांतर होऊ शकते. आळंदीच्या वडगाव रोड कोराडे वस्ती येथे मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे लहान मुले वयोवृद्ध महिला यांचाही त्यामध्ये समावेश आहे आणि आळंदीतील या ठिकाणी बिबट्या दिसण्याची पहिलीच वेळ आहे त्यामुळे नागरिक प्रचंड घाबरलेले दिसून आले आहे.