भीमाशंकरला दर्शनासाठी होणारी गर्दी पाहता मंदिर प्रशासनाने घातली या गोष्टीवर बंदी

Share This News

बातमी 24तास,मराठी न्यूज वेब पोर्टल(वृत्त सेवा)

या वर्षी अधिक महिना आणि श्रावण महिना एकत्र आल्यामुळे सर्वच तीर्थक्षेत्रावर गर्दी होताना पहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील खेड,आंबेगाव तालुक्यात बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेले श्रीक्षेत्र भीमाशंकर येथेही भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

अधिक महिना संपल्यानंतर श्रावण महिना सुरू होत असल्याने भाविकांची आणखी गर्दी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर मंदिर देवस्थानकडून मंदिर परिसरात मोबाइल वापरास बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिक श्रावण महिना सुरू असल्यामुळे गर्दी होत आहे. त्यानंतर सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिर परिसरात मोबाइल वापराला बंदी घालण्यात आली आहे. श्रावण महिन्यात दरवर्षी राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे दरवर्षी श्रावण महिन्यात भीमाशंकर येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते. गर्दीत अनेक अनुचित प्रकार घडत असतात. त्याचा त्रास भाविकांना पर्यायाने मंदिर प्रशासनाला सहन करावा लागतो. मात्र यंदाच्या वर्षी मंदिर प्रशासनाकडून सर्वानुमते मंदिर परिसरात मोबाइल बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांनी गाभारा, मुख्य मंडप आणि मंदिर परिसरात फोटो काढू नयेत, तसेच मोबाइल बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. या आदेशाचे कुणी उल्लंघन केले तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

वरील बातमीतील मजकूराशी मुद्रक, प्रकाशक, संपादक सहमत असतीलच असे नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy