(प्रतिनिधी, अरिफ शेख)आळंदी येथील वास्तव्यात असलेल्या ह. भ. प. लक्ष्मण महाराज पाटील यांनी कीर्तनाच्या माध्यमातून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद आळंदी मध्ये व्यक्त झाले.कीर्तनाच्या माध्यमातून बोलत असताना आळंदीत आम्ही बाप पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही या वाक्यावर आळंदीकर ग्रामस्थांचा मुख्य आक्षेप आहे.मधुगिरीच्या माध्यमातून आळंदीकर यांनी नियमित महाराज मंडळींना साथ दिलेली आहे.असे असताना कीर्तनकार, वारकरी संप्रदाय, अशा स्वरूपात भाषा कशी वापरू शकतो,याचे पडसाद आळंदीमध्ये उमटत आहेत.
याबाबत तीव्र नापसंती व्यक्त करत,निषेध व्यक्त करण्यात येत आहे,तसेच आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने आळंदी पोलीस स्टेशन येथे निषेध करत संबंधित महाराजांवर योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. दरम्यानच्या काळामध्ये ह भ प पाटील महाराज यांनी व्हिडिओ क्लिप द्वारे आळंदीकर यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो तसेच सदरची क्लिप भूतकाळातील कीर्तनातील आहे असा खुलासा केला आहे मात्र आळंदीकर ग्रामस्थ त्यावर समाधान मानताना दिसत नसून संबंधित ह भ प लक्ष्मण पाटील यांनी ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या मंदिरात येऊन समस्त ग्रामस्थांच्या समोर माफी मागावी.अशी मागणी आळंदी पोलीस स्टेशन येथे लावून धरल्याची समजते.निषेध तसेच तीव्र नापसंदी निषेध. आणि कारवाईसाठीचे निवेदन पत्र आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने आळंदी पोलीस स्टेशन या ठिकाणी देण्यात आले.
यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ हजर होते.तरुण युवक मोठ्या संख्येने आळंदी पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यासाठी हजर होते. याबरोबरच ह भ प महाराज मंडळींनी आपल्या नावापुढे आळंदीकर नाव लावू नये यासाठीही तरुण युवक आग्रही असल्याचे दिसून आले.या घटनेचा जाहीर निषेध करत याबाबत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.