पत्नीच्या हातात मुलीचा मोबाइल पाहून संशयाने तो बिघडला, पत्नीला हिटरने चटके देत पतीने क्रुरतेचा कळस गाठत केला अत्याचार

Share This News

बातमी24तास, Digital Media

पुणे क्राईम न्यूज : पत्नीच्या गुप्तांगाला पाणी गरम करण्याच्या हिटरने चटके देऊन, नंतर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून, लोखंडी खलबत्त्याने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे येथील कोंढवा परिसरात घडला. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी ४० वर्षीय पतीला अटक केली आहे.

मुलीचा मोबाइल पत्नीच्या हातात पाहून पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन हे क्रूर कृत्य केले. पीडिता गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी ३५ वर्षीय पीडित महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला, आरोपी पती आणि त्यांची चार मुले कोंढवा खुर्द येथील अश्रफनगर येथे राहतात. ३० एप्रिलला आरोपीने मुलीचा मोबाइल पत्नीच्या हातात असल्याचे पाहिले. त्यामुळे आरोपी चिडला. त्याने पत्नीवर संशय घेऊन त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपीने पत्नीला बेडरूममध्ये नेऊन दरवाजा बंद करून घेतला. मुले घरातच होती; ती आरडाओरडा करत होती.आरोपी पतीने दरवाजा उघडला नाही. त्याने पत्नीला बेडला बांधून ठेवले. पाणी गरम करण्याच्या हिटरने तिला चटके दिले. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती करून क्रूर पद्धतीने त्रास दिला आणि लोखंडी खलबत्त्याने मारहाण केली. आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मुले मोठमोठ्याने रडत होती. त्यांचा आवाज ऐकून आरोपी पतीने दार उघडले आणि आपल्या अल्पवयीन मुलींसमोर अश्लील वर्तन केले. त्यानंतर पीडितेला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पत्नीवर अत्याचार करणाऱ्या 40 वर्षीय नराधम पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

क्रौर्याची परिसिमा गाठलेल्या या प्रकाराने पोलीसही स्तब्ध झाले. गंभीर जखमी झालेल्या पत्नीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy