(प्रतिनिधी, अरिफ शेख) आळंदी अधिकमास चालू असल्याने तसेच रविवार यामुळे माऊलींच्या दर्शनाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात आळंदीत गर्दी असते. त्याचबरोबर लग्नाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात लोक आळंदीत येतात. या परिस्थितीमध्ये जागा मिळेल तिथे चार चाकी गाड्या लावल्याने मोठ्या प्रमाणात मनस्ताप हा आळंदीकर नागरिकांना सहन करावा लागतो.
एक्सीडेंट तर होतातच परंतु मुजोर आणि बेशिस्त वाहनचालकांच्या मग्रुरीमुळे बाहेरून येणाऱ्या भाविक, भक्तांनांही रस्त्यावरून नीट चालता येत नाही.स्थानिक नागरिक तर अक्षरशः वैतागलेले आहेत. येथे वाहन लावू नका असे सांगितले तर वाहन चालक स्थानिक नागरिकांना अरेरावी करत दादागिरी करतात पोलिसांनाही भीत नाही असे दाखवतात आणि काय करायचे ते करा म्हणून निघून जातात गाड्या मात्र रस्त्यात उभे राहतात आणि नाहक झालेला त्रास उघड्या डोळ्याने पाहावा लागतो.
चार चाकी बेशिस्त वाहने उचलण्यासाठी क्रेनची मागणी प्रलंबित आहे. दिघी आळंदी वाहतूक पोलिसांमार्फत वारंवार बेशिस्त पार्क केलेल्या गाड्यांवर चलन करुन कारवाई केली जाते. मात्र जप्तीची कारवाई करण्यासाठी क्रेन वाहन मिळावे रस्ता वीना अडथळा चालू राहिलेला दिसेल अशी ग्वाही दिघे आळंदी वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांचे कडून दिली जात आहे.परंतु बेशिस्त पार केलेल्या चार चाकी वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहन उचलायला क्रेनच नाहीत आणि चलन च्या माध्यमातून फक्त कारवाई अशा तटपूजा परिस्थितीमध्ये शिस्त लावणार तरी कशी अशी विचारणा आळंदी पोलीस करीत आहेत.
याबाबतचा मोठ्या प्रमाणात त्रास वाढलेला आहे.आळंदीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून मोठमोठे रस्ते झालेत. परंतु हे रस्ते मात्र चार चाकी वाहन चालक वाहन पार्क करण्यासाठी वापरत असल्याने त्याचा म्हणावा तितका फायदा वारकरी, भाविकांना झालेला नाही, होत ही नाही.पर्यायाने आळंदीकर नागरिकही त्यापासून वंचित आहे.मुळात नो पार्किंग मध्ये गाडी लावून ठेवणेचा त्रासच जास्त आहे.पार्किंगच्या आरक्षित जागा आहेत. परंतु गावठाणापासून लांब असल्याने बाहेरून येणारे वाहन चालक तेथे मात्र वाहने लावण्यास तयार नाहीत.तर आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे असे म्हणतात की वाहनांवर कारवाई केली तर आपोआप पार्किंग असलेल्या ठिकाणी ही वाहने पार्क होतील.परंतु दिघी आळंदी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार म्हणतात की क्रेन नाही, जामर नाही, वाहन जप्त कारवाई करायला मोठी वाहने उपलब्ध नाहीत. कारवाई करणार कशी यामध्ये स्थानिक ग्रामस्थ नागरिकांचा मात्र हिरमोड होत आहे.मुळात बेशिस्त रस्त्यावर नो पार्किंग झोन मध्ये गाड्या लागणे याबाबत सर्वांनाच त्रास आहे.याचा आळंदी पोलिसांच्या डोक्याला ताप तर स्थानिक नागरिक मात्र पूर्णपणे वैतागलेले आहेत यावर योग्य कारवाई होईल,काही मार्ग निघेल, अशी आशा वाटते.तर दिघी आळंदी वाहतूक विभाग पोलीस यांना वाहने उचलणारी क्रेन उपलब्ध करून दिल्यास जवळजवळ सगळाच प्रश्न सुटू शकतो.अशी आशा वाटते.