शिक्रापूर येथे एलपीजी सिलेंडरचा स्फोट; दोन जखमी

Share This News

बातमी 24तास, Web News शिक्रापूर: शिक्रापूर (जि. पुणे) येथे गुरुवारी(ता. ३ ऑगस्ट) एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एलपीजी सिलेंडरचा स्फोट होऊन एक महिला गंभीर भाजली. वैष्णवी अनिल कोथळकर (२०) असे त्या महिलेचे नाव आहे.

शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी या घरात जेवण बनवत असताना अचानक गॅस सिलिंडर गळतीमुळे स्फोट झाला. स्फोटाच्या मोठ्या आवाजामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी दरवाजा तोडून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले.याच घटनेत घराबाहेर असलेला प्रथमेश राजू सरोदे (वय १९) हा तरुणही जखमी झाला. दोघांनाही वैद्यकीय उपचारासाठी पुण्यातील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. शिक्रापुर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy