भिगवण पोलीसांची दमदार कामगिरी, शेतकऱ्यांना दिलासा, चोरी करणारे अटल गुन्हेगार जेरबंद करून तब्ब्ल ८,०९,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

Share This News

बातमी 24तास

(वृत्त सेवा ) भिगवण परीसरामधून शेतक-यांच्या पाण्याच्या इलेक्ट्रीक मोटार चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. शेतक-यांवर अगोदरच दुष्काळाचे सावट असताना त्यातच त्यांच्या इलेक्ट्रीक मोटारी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे शेतकरी वर्ग हा हवालदिल झाला होता. त्याचे गांभीर्य पाहुन पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल, यांनी जिल्हयातील शेतक-यांशी निगडीत असलेल्या गुन्हयांचा सखोल तपास करून ते गुन्हे उघडकीस आणणेबाबत सक्त सुचना दिल्या होत्या.दिनांक १९/०७/२०२३ रोजी रात्रौ २२:०० ते दिनांक २०/०७/२०२३ रोजी पहाटे ०७:०० वा चे दरम्यान मौजे डाळज नंबर २ गावचे हददीत डाळज नंबर २ ते कुंभारगाव रोड असा भादलवाडी तलावाचे पायथ्याचे लगत फिर्यादी अवुधत दादासाहेब जगताप, रा.डाळज नंबर २, ता इंदापुर, जि. पुणे यांचे मालकिची टेस्को कंपनीची इलेक्ट्रीक पाण्याची मोटार १२.५ एच.पी.ची कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेलेबाबत भिगवण पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नंबर ३५६/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. भिगवण परीसरामधुन शेतकरी यांच्या पाण्याच्या इलेक्ट्रीक मोटार चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. शेतकरी यांचेवर अगोदरच दुष्काळाचे सावट असताना त्यामधुन त्यांच्या इलेक्ट्रीक मोटारी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे शेतकरी वर्ग हा हवालदिल झाला होता. त्याचे गांभीर्य पाहुन पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल यांनी जिल्हयातील शेतक-यांशी निगडीत असलेल्या गुन्हयांचा सखोल तपास करून ते गुन्हे उघडकीस आणणेबाबत सक्त सुचना दिल्या होत्या त्यानुसार भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार, सहा पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे शोध पथक (डी.बी) यांना मार्गदर्शन केले. भिगवण पोलीस स्टेशन येथे वरील प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयांचा समांतर तपास चालू असताना गोपनिय बातमीदारा मार्फेत बातमी काढून तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपी क्रमांक १) विश्वजीत उर्फ सुंदर तुकाराम ढवळे, वय २३ वर्ष, २) रोहन उर्फ सुखराम डोबाळे, वय २१ वर्षे सर्व रा. मदनवाडी, ता. इंदापुर जि.पुणे यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे गुन्हयाचा सखोल तपास करता त्यांनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिली व गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल काढुन दिला. तसेच त्यांचेकडे अधिक विचापुस करता त्यांनी खालील प्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिली.वरील अटक आरोपी यांचेकडुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणले आहेत.. १) भिगवण पो.स्टे. गुन्हा रजि. नं. ६३/२०२३, भादवि कलम ३७९ २) भिगवण पो.स्टे. गुन्हा रजि.नं. १५/२०२३ भादवि कलम ३७९,३) भिगवण पो.स्टे. गुन्हा रजि. नं. १०४/२०२३ भादवि कलम ३७९,४) भिगवण पो.स्टे. गुन्हा रजि. नं. २७३ / २०२१ भादवि कलम ३७९ ७) भिगवण पो.स्टे. गुन्हा रजि. नं. २२८/२०२१, भादवि कलम ३७९,५) भिगवण पो.स्टे. गुन्हा रजि. नं. २१८/२०२२ भादवि कलम ३७९,६) भिगवण पो.स्टे. गुन्हा रजि. नं. १०/२०२२, भादवि कलम ३७९, ७) भिगवण पो.स्टे. गुन्हा रजि. नं.१९८ / २०२१ भादवि कलम ३७९, ८) भिगवण पो.स्टे. गुन्हा रजि. नं.१७६ / २०२१ भादवि कलम ३७९ १०) भिगवण पो.स्टे. गुन्हा रजि. नं. १६० / २०२१, भादवि कलम ३७९ वरील प्रमाणे गुन्हे उघडीस आले असुन सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या पाण्याच्या १९ इलेक्ट्रीक मोटारी व एक पाण्याचे इंजिन असा एकुण २,६४,०००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.६) भिगवण पो.स्टे. गुन्हा रजि. नं. १३४ / २०२१ भादवि कलम ३७९ १२) भिगवण पो.स्टे. गुन्हा रजि.नं.१२१ / २०२१, भादवि कलम ३७९मोटार सायकल / फ्रिज/एल.सी.डी.टी.व्ही. चोरी:- पोलीस स्टेशनचे हददीत पेट्रोलींगकरीत असताना एक मोटार सायकल वरून दोन इसम सराईत रित्या गाडीवर इलेक्ट्रीक फिज व एल.सी. डी.टी. की घेवून जात असताना मिळून आले असता त्यांना थांबून त्यांचेकडे त्यांचे ताब्यातील वस्तुबाबत विचारपुस करता त्यांना काही एक समाधान कारक माहीती देता आली नाही. ते उडवाडविची उत्तरे देऊ लागली. त्यावेळी पुर्ण खात्री झाली की, सदर इसमांनी सदरच्या वस्तु हया कोठुन तरी चोरी केल्या असाव्यात म्हणून इसम १) नितीन सखाराम हरीहर, वय ३३ वर्ष, २) सलीम मेहबुब शेख, वय २५ वर्ष, दोघे रा. मदनवाडी, ता. इंदापुर, जि.पुणे यांचेविरुद्ध भिगवण पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नंबर, ३६० / २०२३, मुंबई पोलीस कायदा कलम १२४ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांचेकडे अधिक विचारपुस करता त्यांनी आणखी दोन मोटार सायकली काढुन दिल्या. अशा प्रमाणे सदर आरोपी याचेकडुन ३ मोटार सायकली,१ इलेक्ट्रीक फिज व १ एल.सी.डी.टी.व्ही असा एकूण २,०५,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर आरोपी यांनी सदरच्या वस्तु कोठुन चोरी केल्या आहेत याबाबत सखोल तपास चालू आहे.हरवलेले मोबाईल:- भिगवण पोलीस स्टेशनचे हददीतुन सन २०२२ / २०२३ या कालावधी तकारदार यांचे हरवलेले विविध कंपनीचे मोबाईल यांचा तांत्रिक विश्लेषणाचे आधारे शोध घेवून एकुण १० मोबाईल असा एकूण अंदाजे किंमत ३,४०,०००/- रू किंमतीचा मुददेमाल हस्तगत केले आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल, आनंद भोईटे, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण, गणेश इंगळे, उपविभागीय पोलीस अधीकारी, बारामती विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली दिलीप पवार, सहा.पोलीस निरीक्षक, भिगवण पो.स्टे. भिगवण पो. स्टेचे पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम, पोलीस अमलदार विठठ्ल वारगड, सचिन पवार, महेश उगले, अंकुश माने, हसीम मुलाणी, आप्पा भांडवलकर यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अंमलदार विठल वारगड, महेश उगले हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy