बातमी 24तास(वृत्त सेवा )
दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांवरुन पुणे पोलिसांनी कोथरूड परिसरातून आठ दिवसापूर्वी अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांना कोंढव्यामध्ये आश्रय देण्यासाठी आर्थिक पुरवठा करणाऱ्या एकाला रत्नागिरी येथे महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे.दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांवरुन पुणे पोलिसांनी 18 जुलै रोजी दोन संशयितांना अटक केली होती. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने आता ही कारवाई केली.याबाबत अधिक माहिती अशी की,पुणे पोलिसांनी 18 जुलै रोजी पहाटे पुणे शहरातील कोथरुड परिसरातून मोहम्मद युनूस मोहम्मद याकुब साकी (वय -24), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय-23, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा- मुळ रा. रतलाम, मध्यप्रदेश) यांना पकडले होते. तर मोहम्मद शहनवाज आलम (वय 31) हा फरार झाला आहे.
आरोपींना पुण्यात आल्यानंतर आश्रय देण्यासाठी त्यांची मदत करणाऱ्या आरोपीला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी (दि.26) अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.तसेच या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी परराज्यात गेलेल्या पोलीस पथकाने एका संशयित व्यक्तीला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे.तो आल्यानंतर त्याच्याकडे गुन्ह्यातील सहभागाबाबत तपास केला जाणार आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींचा फरार झालेला साथीदार तसेच फरार कालावधीत मदत करणाऱ्यांचा तपास महाराष्ट्र एटीएस करत करत आहे.कोंढवा परिसरात राहत होतामोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान आणि मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी हे पुणे शहरातील कोंढव्यात राहत होते. या दोघांना कोंढवा येथे घर देणारा अब्दुल पठाण याला एटीएसने शुक्रवारी अटक केली होती. पठाण याने फक्त त्यांना घरच दिले नाही तर ग्राफिक डिझाईनचे कामही दिले. त्या कामासाठी त्यांना तो आठ हजार रुपये मासिक पगार देत होता. तसेच या दोघ दहशतवाद्यांना आर्थिक पुरवठा करणारा आणखी कोण आहे? याचा शोध एटीएस घेत होते.रत्नागिरीतील एकाला अटकमोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान आणि मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी यांना आर्थिक पुरवठा केल्या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली. शनिवारी एटीएसने त्याला रत्नागिरीहून चौकशीसाठी बोलवले होते. चौकशीनंतर दहशतवाद्यांशी त्याचा संबध असल्याचं निष्पन्न झाल्यामुळे एटीएस त्याला अटक केली. या प्रकरणात एटीएसने केलेली ही चौथी अटक आहे. शिवाय परराज्यात एका संशयिताला नोटीस बजावण्यात आली आहे.तो अद्याप फरारचयुसूफ खान आणि याकुब साकी याच्यासोबत असणारा तिसरा आरोपी शहानवाज आलम अजूनही फरार झाला. ATS कडून त्याचा शोध सुरु आहे. आलम याने या दोघांना लॉजिस्टिक मदत केली होती. त्याला लवकरच अटक होईल, असा विश्वास एटीएसकडून व्यक्त केला जात आहे.