बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी ए.पी.आय. शहाजी पवार पुन्हा उतरले रस्त्यावर

Share This News

बातमी 24तास

(आळंदी प्रतिनिधी,आरिफभाई शेख) आपल्या कर्तव्य दक्षतेने नेहमीच आश्चर्याचा धक्का देणारे आळंदी वाहतूक विभागाचे एपीआय शहाजी पवार यांनी आज बेशिस्त वाटचालकांना पुन्हा दंडुका दाखवला. मुळात ट्रिपल सीट टू व्हीलर वाले महिला वाहतूक पोलिसाच्या अंगावर गाडी घालतात थांबल्यावर थांबत सुद्धा नाही.याची प्रचंड चीड आणि संताप शहाजी पवार यांनी व्यक्त केला. अशा घटना वारंवार घडत आहे याची खंत व्यक्त केली. त्याचबरोबर स्वतःच्या जीवाची परवा न करता न थांबणाऱ्या गाडीला सामोरे जात. धडक कारवाई केलेली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की महिला वाहतूक पोलिसांच्या अंगावर युवक तरुण बेशिस्त वाहन चालक थांबवण्याचा प्रयत्न केला तर अंगावर गाडी घालतात अश्या स्वरूपाच्या तक्रारी आल्या होत्या.

दरम्यान पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त विनयकुमार चौबे यांनीही बेशिस्त वाहन चालक, काळ्या काचा, रफ ड्रायव्हिंग बाबत कडक कारवाई साठी दिघी आळंदी वाहतूक विभाग चे एपीआय शहाजी पवार यांना सूचना केल्या होत्या. तसेच पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये एक वाहतूक पोलीस याच प्रकारामुळे जखमी झालेला आहे. अशी माहिती मिळाली हे ऐकताच एपीआय शहाजी पवार यांना बेशिस्त वाहनचालकांच्या बाबत प्रचंड संताप आला. त्यांनी भर पावसामध्ये आणि पोलीस कर्मचारी सोबत नसताना देखील डायरेक्ट आळंदी पुणे रस्त्यावर उभे राहत. बेशिस्त आणि ट्रिपल सीट जाणारी वाहने पकडण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर गाड्या जप्त करत दंडात्मक कारवाई केली.यामध्ये बरेचसे अल्पवयीन मुलही गाडी चालवताना आढळून आले आहे. तसेच एका दुचाकीच्या ट्रिपल सीटवर जाणाऱ्या तरुण हुल्लडबाजी करत होते. याबाबत दिघी आळंदी वाहतूक विभागाचे एपीआय शहाजी पवार यांनी त्या तरुणांची कान उघडनी ही चांगल्याच प्रकारे केली आणि कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले.तसेच सज्जनाला आपुलकी वाटली पाहिजे आणि दुर्जनाला कर्दनकाळ वाटावा यासाठी पोलीस असतो.असेही त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.मुळात एपीआय शहाजी पवार यांची कामगिरी आळंदी भागामध्ये वाखाणण्याजोगी आहे. कर्तव्यदक्ष,तसेच शिस्तप्रिय आणि कायदा मोडणार याची तमा न करणारे अधिकारी म्हणून त्यांना सर्वजण सिंघम म्हणूनच ओळखतात.वेळीअवेळी मध्यंतरीच्या काळामध्ये विधानभवनाच्या सदस्य स्टिकर असलेले गाडी पकडत.त्यांनी त्यावरही कारवाई केली होती. त्यावेळी असे निदर्शनास आले होते की सदर व्यक्तीचा विधान भवन सदस्य यांच्याशी म्हणजेच फक्त आमदार च हे स्टिकर लावू शकतात असे असतानाही. काहीही संबंध नसताना.कुठलेही आमदार किंवा त्यांची गाडी नसताना यांची केवळ स्टिकर लावून हे लोक मिरवत होते.एपीआय शिवाजी पवार यांनी यावेळी नोकरीची परवा न करता. सदर गाडीला हात दाखवून विधानसभा सदस्य असल्याची चौकशी सुरू केली. चौकशी अंती सदर वाहन चालकाचा विधान भवन सदस्य यांच्याशी कुठलाही संबंध मिळून आलेला नाही. अथवा सदर गाडी कुठल्याही आमदाराची नाही हे लक्षात आले. आणि गाडी जप्त करत दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश एपीआय शहाजी पवार यांनी दिले होते. दरम्यान आळंदी परिसरामध्ये ट्रिपल सीट वाहन चालवणे,बेशिस्त वाहन चालवणे, बेशिस्त पार्किंग करणे, याबाबत शिस्त लावण्याचे काम एपीआय शहाजी पवार करत आहेत, आज बऱ्याच गाड्या या ट्रिपल सीट असेलल्या पकडत कारवाई करण्यात आली आहे. शिस्त प्रिय नागरीक या बाबत समाधान मानताना दिसुन येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy