बातमी 24तास
(प्रतिनिधी, सम्राट राऊत )
लायन्स क्लब ऑफ चाकण सफायर व लिओ क्लब ऑफ चाकण सफायर चा पदग्रहण सोहळा आणि शपथविधी समारंभ शुक्रवार दी 7 जुलै रोजी चाकण येथील हॉटेल आरती येथे सम्पन झाला या सोहळ्याच्या निमित्ताने पदग्रहण अधिकारी म्हणून माजी प्रांतपाल लायन राज मुछाल व शपथविधी अधिकारी म्हणून डिस्ट्रिक्ट कॅबिनेट ट्रेजयन संतोष सोनावळे हे उपस्थित होते. मावळत्या अध्यक्षा लायन शितल गावडे यांनी वर्ष 2023-24 साठी नवनिर्वाचित अध्यक्ष लायन चंद्रकांत सोनवणे यांच्याकडे अध्यक्ष पदाचा पदभार सोपविला. तसेच सचिव म्हणून लायन नितीन मुंगसे आणि खजिनदार म्हणून लायन डॉ नवदीप यादव यांनी पदभार स्वीकारलातसेच लिओ क्लबचे अध्यक्ष लिओ ओम गायकवाड सेक्रेटरी लिओ निरंजनी मुंगसेखजिनदार लिओ वैष्णवी करपे यांनी देखील पदभार स्वीकारला पुढील वर्षातील कालावधीमध्ये सामाजिक /आरोग्य /कला आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक नवीन उपक्रम राबविण्याचा मानस नूतन अध्यक्ष लायन. चंद्रकांत सोनवणे यांनी बोलून दाखविला.या प्रसंगी नवीन 20 सदस्य लायन्स क्लब चाकण सफायर मध्ये समाविष्ट झाले सदर कार्यक्रमासाठी लायन्स क्लब ऑफ चाकण सफायर चे सर्व सदस्य व चाकण पंच क्रोशीतील नागरिक उपस्थित होते.लायन स्वाती कांडगे यांनी सूत्रसंचालन केले व कमिटी चेअरमन लायन राजू गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले